जाहिरात
मराठी बातम्या / Viral / लवकरच असं काम करणार नवरा की खूश झाली बायको; आनंदात गिफ्ट केली तब्बल 5 कोटींची लक्झरी कार

लवकरच असं काम करणार नवरा की खूश झाली बायको; आनंदात गिफ्ट केली तब्बल 5 कोटींची लक्झरी कार

लवकरच असं काम करणार नवरा की खूश झाली बायको; आनंदात गिफ्ट केली तब्बल 5 कोटींची लक्झरी कार

कामाआधीच बायकोने नवऱ्याला कार गिफ्ट करत दिलं मोठं सरप्राईझ.

  • -MIN READ
  • Last Updated :

क्वालालांपूर, 17 मार्च : सामान्यपणे बायको खूश झाली की नवऱ्यासाठी त्याच्या आवडीचे पदार्थ बनवते, त्याला आवडणाऱ्या गोष्टी करते किंवा त्याला एखादं गिफ्ट देते. आता हे गिफ्ट काही शे किंवा फार फार तर हजारोंमध्ये असेल. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल एका महिलेने आपल्या पतीला कोट्यवधींचं गिफ्ट दिली आहे. तिचा नवरा असं काही काम करणार आहे, ज्यामुळे ती खूश झाली आणि तिने आनंदात त्याला तब्बल 5 कोटी रुपयांची लक्झरी कारच गिफ्ट केली (Wife gifted luxury car to husband). मलेशियातील 19 वर्षांची अयूनी उस्मानने (Anes Ayuni Osman) आपला 20 वर्षांचा नवरा वेल्डन ज़ुल्केफलीला (Weldan Zulkefli) सर्वात मोठं सरप्राइझ दिलं आहे. तिने त्याला लॅम्बोर्गिनी ह्यूराकन इवो (Lamborghini Huracan Evo) गिफ्ट केली आहे. ज्याची किंमत 5 कोटी रुपये आहे. गिफ्टची किंमत ऐकूनच तुम्हाला चक्कर आली असेल. आता इतकं महागडं गिफ्ट देण्यासाठी तसं काहीतरी कारणही हवं नाही का? वेल्डनचा बर्थडे नाही, त्यांची वेडिंग अॅनिव्हर्सरी नाही, त्याला ऑफिसमध्ये प्रमोशन मिळालं तर तसं नाही किंवा त्याने इतर कोणत्या कामात यश मिळवलं तर तसंही नाही. मग अयूनीने इतकं महागडं गिफ्ट वेल्डनला देण्याचं कारण काय? तर अयूनी आणि वेल्डनचं येणारं बाळ. हे वाचा -  अजबच आहे! स्वप्नात दुसऱ्या महिलेसोबत दिसला BF; दुसऱ्याच दिवशी GF ने केलं ब्रेकअप अयूनी प्रेग्नंट आहे. मार्चच्या अखेरपर्यंत ती आपल्या पहिल्या बाळाला जन्म देईल. बाळाच्या जन्माआधीच तिला आपल्या नवऱ्याचे आभार मानायचे होते. कारण बाळाच्या जन्मानंतर अनीस 100 दिवसांच्या प्रसूती रजेवर असेल. ती तशी फार कामं करू शकणार नाही, जास्तीत जास्त आराम करेल. यावेळी ती आपल्या पतीवर अवलंबून असेल, तो तिला मदत करेल. बाळाच्या जन्मानंतर पतीला तिच्यासह बाळाची कमीच करावं लागतील, रात्री जागरण करावी लागेल यासाठी तिला आधीच त्याचे आभार मानायचे होते. म्हणून बाळाच्या जन्माआधी तिने त्याला ही कार गिफ्ट केली.

अनीसने टिकटॉकवर पोस्ट केलेला आपला हा व्हिडीओ अमेझिंग वर्ल्ड नावाच्या युट्यूब अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. ज्यात ती एका गाडीतून आपल्या नवऱ्यासोबत एका ठिकाणी जाते. ती आपल्या नवऱ्याच्या डोळ्यांवर पट्टी बांधते. त्यानंतर एका कार शोरूममध्ये पोहोचते. तिथं जाऊन ती वेल्डनच्या डोळ्यांवरील पट्टी हटवते. वेल्डनसमोर लाल बो लावलेली एक भलीमोठी लक्झरी कार असते. ही अनीसने त्याला गिफ्ट केली. हे वाचा -  …तर कुणीही सहजपणे तुमच्या प्रेमात पडेल; तज्ज्ञांनी सांगितली सोपी जादुई ट्रिक बायकोने दिलेलं हे सरप्राइझ पाहून वेल्डनच्या आनंदाला पारावर उरत नाही. तो अनीसला मिठी मारतो आणि ढसाढसा रडू लागतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात