Home /News /national /

अफगाणिस्तानबाबत भारताची भूमिका काय? SCO बैठकीत पंतप्रधान मोदींनी केलं स्पष्ट

अफगाणिस्तानबाबत भारताची भूमिका काय? SCO बैठकीत पंतप्रधान मोदींनी केलं स्पष्ट

दुशांबेमध्ये सुरू असलेल्या SCO च्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी व्हर्च्युअल माध्यमातून मार्गदर्शन केलं.

नवी दिल्ली, 18 सप्टेंबर: ‘अफगाणिस्तानात झालेलं सत्ता परिवर्तन हे सर्वसमावेशक नाही तसंच ते संवादातून झालेलं नाही त्यामुळे तालिबानने स्थापन केलेल्या सरकारला मान्यता देण्याची घाई करू नये,’ असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Prime Minister Narendra Modi) शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (SCO) सदस्य देशांना केलं. दुशांबेमध्ये सुरू असलेल्या SCO च्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी व्हर्च्युअल माध्यमातून मार्गदर्शन केलं. यात त्यांनी भारताची अफगाणिस्तानबद्दलची भूमिका स्पष्ट केली. याबाबतचं वृत्त नवभारत टाइम्सनं दिलं आहे. ते म्हणाले, ‘अफगाणिस्तानच्या जमिनीचा वापर दहशतवादाला खतपाणी (Use of Afghanistan’s soil for Terror) घालण्यासाठी होणार नाही हे आधी निश्चित झालं पाहिजे. सीमेपलीकडून पसरवला जाणारा दहशतवाद आणि त्यांना होणारा आर्थिक पुरवठा या दोन्ही गोष्टींवर लक्ष ठेवण्यासाठी एक कोड ऑफ कंडक्ट तयार केला पाहिजे.’ Shanghai Cooperation Organisation (SCO) शी संबंधित कलेक्टिव्ह सिक्युरिटी ट्रिटी ऑर्गनायझेशनशी संबंधित देशांच्या अध्यक्षांच्या 21 व्या शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी बोलत होते. संयुक्त राष्ट्रांनी अफगाणिस्तानबाबत घेतलेल्या भूमिकाला दुजोरा देत मोदी म्हणाले,‘ तालिबानने स्थापन केलेल्या सरकारमध्ये समाजातील सगळ्या घटकांचा समावेश नाही. तसंच महिला आणि अल्पसंख्य समाजातील व्यक्तींना या सरकारमध्ये अजिबात स्थान नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सत्तापरिवर्तन (Change in Government) हे सर्वसमावेशक नाही आणि कोणतीही चर्चा न करता हे परिवर्तन झालं आहे. त्यामुळेच नव्या सरकारला मान्यता द्यायची का हा प्रश्न उभा राहतो? महिला, अल्पसंख्य समाजाबरोबरच अफगाणिस्तानातील सर्व समाजघटकांचं प्रतिनिधित्व (Representation in Government) सरकारमध्ये असायलाच हवं. त्यामुळे तालिबानने स्थापन (Taliban Government) केलेल्या अफगाणिस्तानातील सरकारला मान्यता देताना जागतिक संघटना आणि देशांनी विचारपूर्वक एकत्रितपणे निर्णय घ्यायला हवा. या सत्ता परिवर्तनाचा सगळ्यात महत्त्वाचा परिणाम अफगाणिस्तानच्या शेजारी देशांवर होणार आहे त्यामुळे त्याबाबतही विचार व्हायला हवा.’

दहशतवादी मॉड्यूल: ओसामाचा काका हुमैद उर्रहमान प्रयागराज पोलिसांच्या ताब्यात

 अफगाणिस्तानातील सत्ताबदलामुळे शेजारी राष्ट्रांसमोर उभी राहिलेली आव्हानं काय आहेत याची जाणीव पंतप्रधान मोदींनी जागतिक नेत्यांना आपल्या भाषणातून करून दिली. ते म्हणाले, ‘ भारत अफगाणिस्तानला मदत करायला तयार आहे. पण तालिबानला समर्थन दिलं तर जगभरातील इतर दहशतवादी संघटनांनाही (Terrorist Organisations) अशाचप्रकारे कब्जा करून देशांतील सत्ता हस्तगत करण्याची इच्छा निर्माण होऊ शकते. त्यामुळे अंमली पदार्थ, बेकायदेशीर शस्रास्र आणि मानवी तस्करीचं प्रमाण प्रचंड वाढेल आणि ते अनियंत्रित होईल. तसंच अमेरिकी लष्कराकडे असलेली अत्याधुनिक शस्रास्र (Advanced Weapons) मोठ्या प्रमाणात अफगाणिस्तानाच राहिली आहेत त्यामुळे अफगाणिस्तानच्या बाजूच्या देशांमध्ये दहशतवाद वाढण्याची शक्यताही नाकारता येत नाही. ’

बंगळुरु: घरात आढळले 5 जणांचे मृतदेह, 9 महिन्याच्या चिमुकल्याचा भुकेनं मृत्यू

 ‘अफगाणिस्तानमध्ये अस्थिरता आणि कट्टरता कायम राहिली तर जगातील दहशतवादी गटांना प्रोत्साहन मिळेल. त्यामुळे भविष्यातील जगासमोर असणाऱ्या धोक्याचा विचार करून SCO तील सर्वच देशांनी दहशतवाद्यांना आर्थिक मदत रोखण्यासाठी कठोर कायदे करायला हवेत,’ असा इशाराही मोदींनी सर्व देशांना दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची विरोधी पक्षावर टीका; म्हणाले...'2.5 कोटी लोकांनी लस घेतली, पण ताप आला एका पक्षाला

तालिबानच्या एका मोठ्या नेत्याशी भारतीय अधिकाऱ्यांनी चर्चा केल्याची बातमी आली होती पण तालिबानने मात्र भारतीय राजदूतांशी चर्चा झाल्याचं मान्य केलं नव्हतं. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी भारताची भूमिका स्पष्ट केली आहे. रशिया ज्याप्रमाणे तालिबानसोबत काम करत आहे पण त्यांनी तालिबानी सरकारला मान्यता दिलेली नाही. भारताचीही भूमिका सध्या अशीच आहे त्यामुळे भारत तालिबानी सरकारला मान्यता देण्याची घाई करणार नाही हे मोदींनी आपल्या भूमिकेतून स्पष्ट केलं आहे.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Afghanistan, Narendra modi, Pm modi, Taliban

पुढील बातम्या