Home /News /national /

दहशतवादी मॉड्यूल: ओसामाचा काका हुमैद उर्रहमान प्रयागराज पोलिसांच्या ताब्यात, हाताळत होता भारतातले दहशतवादी मिशन

दहशतवादी मॉड्यूल: ओसामाचा काका हुमैद उर्रहमान प्रयागराज पोलिसांच्या ताब्यात, हाताळत होता भारतातले दहशतवादी मिशन

देशातील दहशतवादी मॉड्यूल (Terrorist Module) उघडकीस आल्यानंतर दिल्ली पोलिसांचे (Delhi Police) स्पेशल सेल (Special Cell) हुमैद उर्रहमानचा शोध घेत होते.

    प्रयागराज, 18 सप्टेंबर: दहशतवादी कनेक्शनशी (Terrorist connections) संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. देशातील दहशतवादी मॉड्यूल (Terrorist Module) उघडकीस आल्यानंतर दिल्ली पोलिसांचे (Delhi Police) स्पेशल सेल (Special Cell) हुमैद उर्रहमानचा शोध घेत होते. जो दिल्लीत अटक करण्यात आलेल्या ओसामाचा काका आहे. हुमैद उर्रहमाननं करेली पोलीस ठाण्यात सरेंडर केलं आहे. ओसामाचे वडील दुबईत आयएसआयचा हँडलर आहे. हुमैद उर्रहमान दुबईत बसलेल्या आपल्या भावाच्या सांगण्यावरून भारतातील मिशन हँडल करत होता. हुमैद हा लखनऊमध्ये अटक झालेल्या आमिर बेगच्या बहिणीचा सासरा आहे. सध्या करेली पोलीस ठाण्यात त्याची चौकशी सुरु आहे. आमिरही हुमैदच्या नेटवर्कद्वारे या जोडणीत सामील झाला. पाकिस्तानात ट्रेनिंगसाठी पाठवण्यात आलेल्या जीशानला रेडेक्लाइज करण्याचं काम हुमैदनेच केलं होतं, अशी माहिती समोर आली आहे. मोठी बातमी: विराट कोहलीला BCCI देणार आणखी एक धक्का, सर्वात मोठा 'शत्रू' येणार परत टेरर मॉड्यूलचा मास्टरमाईंड ओसामा आणि जिशान असे होते की त्यांनी पाकिस्तानमध्ये ट्रेनिंग घेतलं होतं. यूपी एटीएस (UP ATS) आणि दिल्ली पोलिसांना (Delhi Police) माहिती मिळाली की, हे दहशतवादी सणांदरम्यान मोठा हल्ला करण्याचा प्लान आखत होते. पण आता जेव्हा त्यांच्या अटकेनंतर तपास सुरू केला असता अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. एजन्सीजनुसार असं सांगितलं जात आहे की, या संपूर्ण घटनेचा खरा मास्टरमाईंड ओसामाचे वडील उसैदूर रहमान आहेत. ज्यांनी पाकिस्तानमध्ये ट्रेनिंग घेतलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, ओसामाचे वडील सध्या दुबईमध्ये आहेत आणि तेथे जे मदरसा चालवतात ते थेट ISIच्या संपर्कात आहे. आता ओसामाच्या चौकशी दरम्यान, या संपूर्ण घटनेत त्याच्या वडिलांची भूमिका स्पष्ट झाली आहे. असे काही चॅटही सापडले आहेत, ज्याच्या आधारे ओसामाचे वडील मास्टरमाईंड म्हणून सांगितले जात आहेत. ISIच्या मदतीनं ओसामा पाकिस्तानात ट्रेनिंगसाठी गेला होता. मुंबईत महिला लसीकरण विशेष सत्र, Walk In येत लाखभर महिलांनी घेतला लाभ मुंबईतून एक संशयित दहशतवादी ताब्यात दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने (Delhi Police Special Cell) विविध ठिकाणांहून सहा दहशतवाद्यांना अटक (six terrorist arrest) केल्यानंतर आता महाराष्ट्र एटीएसने (Maharashtra ATS) मोठी कारवाई केली आहे. महाराष्ट्र एटीएसने मुंबईतून एका संशयित दहशतवाद्याला ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव झाकीर (Zakir) असल्याची माहिती समोर आली आहे. (Maharashtra ATS taken one person from Mumbai in connection with terror module busted by Delhi police special cell) दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या सहा दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी हा मुंबईत राहणारा होता. त्यातच आता महाराष्ट्र एटीएसने मुंबईतून आणखी एका संशयित दहशतवाद्याला ताब्यात घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. एएनआय न्यूज एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार, ही कारवाई रात्री उशिरा महाराष्ट्र एटीएस आणि मुंबई पोलिसांनी केली आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Delhi Police, Terrorists

    पुढील बातम्या