Home /News /national /

देशाच्या इतिहासात प्रथमच होणार एका महिलेला फाशी, जाणून घ्या गुन्हेगाराच्या कानात जल्लाद काय शेवटचे शब्द बोलतो

देशाच्या इतिहासात प्रथमच होणार एका महिलेला फाशी, जाणून घ्या गुन्हेगाराच्या कानात जल्लाद काय शेवटचे शब्द बोलतो

भारतात कोणत्या प्रकारे एखाद्या गुन्हेगाराला फाशी दिली जाते? फाशीच्या शिक्षेआधी कोणत्या कायदेशीर बाबी पूर्ण कराव्या लागतात आणि फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करणारा जल्लाद शिक्षेआधी गुन्हेगाराच्या कानात कोणते शब्द उच्चारतो? जाणून घेऊ सविस्तर..

पुढे वाचा ...
  नवी दिल्ली, 1 मे : सध्या देशभरात शबनम (shabnam case) प्रकरणाची चर्चा जोरात सुरू आहे. स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच एका महिलेला फाशीची शिक्षा (woman sentenced to death) सुनावण्यात आली आहे. शबनम नावाच्या महिलेला उत्तर प्रदेशच्या मथुरा तुरुंगात फाशी दिली जाणार आहे. मात्र, केवळ फाशीची तारीख निश्चित व्हायची आहे. शबनमने तिचा प्रियकर सलीमसोबत तिच्याच घरात हत्याकांड (mass murder) केले होतं. ती सध्या रामपूरच्या तुरुंगात आहे. कोण आहे शबनम? उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील बावनखेडी गावात राहणाऱ्या शबनमने तिचा प्रियकर सलीमसोबत मिळून तिच्याच घरातल्या एकूण 7 जणांची हत्या केली होती. 14-15 एप्रिल 2008 च्या रात्री तिने आपल्याच घरात हे हत्याकांड घडवून आणलं. तिने आई-वडील, दोन भाऊ, वहिनी, मावशीची मुलगी आणि निष्पाप लहान मुलाची (भाचा) कुऱ्हाडीने वार करून हत्या केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शबनमने हत्या केलेली वहिनी गर्भवती होती. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून फाशीची शिक्षा झाल्यानंतर राष्ट्रपतींनीही शबनमचा दयेचा अर्ज फेटाळला आहे. आता तिला लवकरच फाशी होणार आहे. जाणून घेऊ, भारतात कोणत्या प्रकारे एखाद्या गुन्हेगाराला फाशी दिली जाते. फाशीच्या शिक्षेआधी कोणत्या कायदेशीर बाबी पूर्ण कराव्या लागतात आणि फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करणारा जल्लाद शिक्षेआधी गुन्हेगाराच्या कानात कोणते शब्द उच्चारतो? काय होतं फाशीच्या दिवशी?
  1. फाशीच्या दिवशी कैद्याला आंघोळ करायला सांगून नवीन कपडे घालायला दिले जातात.
  2. पहाटे कारागृह अधीक्षकांच्या देखरेखीखाली रक्षक कैद्याला फाशीच्या खोलीत आणतात.
  3. फाशीच्या वेळी जल्लादाव्यतिरिक्त तीन अधिकारी उपस्थित असतात.
  4. कारागृह अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी आणि दंडाधिकारी हे तीन अधिकारी तिथे असतात.
  5. अधीक्षक फाशी देण्यापूर्वी दंडाधिकाऱ्याला कळवतात की, कैद्याची ओळख पटली आहे आणि त्याला मृत्यूचं वॉरंट वाचून दाखवण्यात आलं आहे.
  6. डेथ वॉरंटवर कैद्यांच्या सह्या घेतल्या जातात.
  7. फाशी देण्यापूर्वी कैद्याला त्याची शेवटची इच्छा विचारली जाते.
  8. कैद्याच्या अशाच इच्छा पूर्ण होतात, ज्या जेल मॅन्युअलमध्ये असतात.
  9. फाशी देण्याच्या वेळी फक्त जल्लादच दोषीसोबत असतो.
  हे वाचा - बापाच्या अय्याशीमुळे मुलगा त्रस्त; लग्नाआधी उचललं 'हे' धक्कादायक पाऊल फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणीआधी काय तयारी केली जाते? कोणत्याही गुन्हेगाराला फाशी देण्याआधी, जल्लाद कैद्याच्या वजनाचा पुतळा लटकवून फासाची परीक्षा करतो आणि त्यानंतर प्रत्यक्ष गुन्हेगाराला फाशी दिली जाते. दोषीच्या नातेवाईकांना 15 दिवस अगोदर कळवलं जातं की, ते कैद्याला केव्हा शेवटचं भेटू शकतात. हे वाचा - शेतीच्या बांधावरुन गोळीबार, पुढे घडलं असं की वाचून धक्का बसेल... फाशी देणारा 'हे' शेवटचे शब्द दोषी व्यक्तीच्या कानात म्हणतो फाशी देण्यापूर्वी जल्लाद गुन्हेगाराकडे जातो आणि त्याच्या कानात म्हणतो, "मला माफ कर, मी सरकारी कर्मचारी आहे. मला कायद्यानं ही कृती करण्यास भाग पाडलं आहे." यानंतर, जर गुन्हेगार हिंदू असेल तर, जल्लाद त्याला राम-राम म्हणतो, तर गुन्हेगार मुस्लीम असल्यास त्याला शेवटचा सलाम (आखिरी दफा सलाम) म्हणतो. असं म्हटल्यानंतर, जल्लाद लीव्हर ओढतो आणि दोषीचा जीव जाईपर्यंत त्याला लटकवतो. यानंतर, डॉक्टर गुन्हेगाराची नाडीपरीक्षा करतात. मृत्यूची खात्री झाल्यानंतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून नंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जातो.
  Published by:Digital Desk
  First published:

  Tags: Crime, Death Sentence, Murder

  पुढील बातम्या