मराठी बातम्या /बातम्या /देश /

शेतीच्या बांधावरुन झालेल्या भांडणाचं रुपांतर गोळीबारात; एकाच परिवारातील दोन जणांचा मृत्यू, तर...

शेतीच्या बांधावरुन झालेल्या भांडणाचं रुपांतर गोळीबारात; एकाच परिवारातील दोन जणांचा मृत्यू, तर...

शेताच्या बांधावरून कुटुंबात मोठा गृहकलह उफाळला. या कलहात झालेल्या गोळीबारात (firing) काका-पुतण्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.

शेताच्या बांधावरून कुटुंबात मोठा गृहकलह उफाळला. या कलहात झालेल्या गोळीबारात (firing) काका-पुतण्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.

शेताच्या बांधावरून कुटुंबात मोठा गृहकलह उफाळला. या कलहात झालेल्या गोळीबारात (firing) काका-पुतण्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.

    मुजफ्फरनगर, 30 एप्रिल : संपत्तीची हाव किंवा ती मिळवण्यासाठीचा स्वार्थ माणसाला कोणत्या टोकावर घेऊन जाईल याचा काहीच भरोना नाही. संपत्तीसाठी माणसं आपल्या रक्ताच्या नात्यालादेखील होत नाहीत. त्यामुळे त्यातून वादविवाद आणि वेळप्रसंगी मोठा गृहकलक उफाळतो. त्यात एखाद्याचा जीव जातो आणि अनर्थ होतो. उत्तर प्रदेशच्या (UP) मुजफ्फरनगरमध्ये (Muzaffarnagar) अशीच काहीशी घटना घडली आहे. संबंधित घटना ही अतिशय सुन्न करणारी आहे. शेताच्या बांधावरुन कुटुंबातील सदस्य एकमेकांवर चालून गेले. हा वाद थेट गोळीबाळापर्यंत (firing) पोहोचला आणि अखेर ज्याची भीती होती तो अनर्थ घडला. शेताच्या बांधावरुन सुरु झालेल्या गृहकलात काका-पुतण्याचा मृत्यू झाला आहे. संबंधित घटना ही मुजफ्फरनगरच्या जनसाठ कोतवाली परिसरातील अहरोडा गावात घडली. या घटनेमुळे संपूर्ण गाव अस्वस्थ झालं आहे. काय आहे नेमकी घटना? उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यात शनिवारी एका घटनेने खळबळ उडाली. शेतीच्या बांधावरुन झालेल्या वादात एकाच परिवारातील लोकांनी गोळीबार केला. यात काका-पुतण्याचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. तर याप्रकरणी आरोपी पिता-पुत्राला पोलिसांनी अटक केली आहे. एकाच परिवारात शेताच्या बांधावरुन झालेल्या वादातून करण्यात आलेल्या गोळाबारात काका शिवकुमार आणि पुतण्या नकुल यांचा मृत्यू झाला आहे. तर मृत शिवकुमार यांचा मुलगा विशाल आणि मृत नकुलचा भाऊ भारत यांच्या व्यतिरिक्त गावातील एक महिला गंभीर जखमी झाली आहे. या घटनेनंतर पीडित परिवारात एकच खळबळ उडाली आहे. मुजप्फरपूर ग्रामीणचे एसपी अतुल श्रीवास्तव यांनी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला. यानंतर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. तर मृतदेहांचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. हेही वाचा - क्लबमध्ये अल्पवयीन मुलीचा न्यूड व्हिडीओ कांड; 6 दिवसांपासून झाली भयंकर व्यवस्था याप्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत हत्येचे आरोपी वडील जगेश आणि मुलगा सोनूला अटक केली आहे. त्यांच्याकडून परवाना काढलेली बंदूक जप्त करण्यात आली आहे. तर घटनेचे गांभीर्य आणि तेथील परिस्थिती पाहता गावात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Murder news, Uttar pradesh news

    पुढील बातम्या