जाहिरात
मराठी बातम्या / देश / पालघर साधू हत्याकांड प्रकरणी काय कारवाई केली? राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात दिली माहिती

पालघर साधू हत्याकांड प्रकरणी काय कारवाई केली? राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात दिली माहिती

पालघर साधू हत्याकांड प्रकरणी काय कारवाई केली? राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात दिली माहिती

पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे साधूंच्या हत्याकांड प्रकरणी राज्य सरकारकडून नव्याने प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 07 ऑक्टोबर : पालघरमध्ये चोर समजून दोन साधू आणि वाहन चालकाच्या हत्येप्रकरणी राज्य सरकारकडून अखेर सुप्रीम कोर्टात नव्याने प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांवर काय कारवाई करण्यात आली, याची माहिती देण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे साधूंच्या हत्याकांड प्रकरणी राज्य सरकारकडून नव्याने स्टेटस रिपोर्ट दाखल करण्यात आला आहे. या रिपोर्टमध्ये राज्य सरकारने या प्रकरणात पोलिसांवर काय कारवाई केली याची माहिती दिली आहे. 15 पोलिसांना पगारामध्ये कपात करण्याची शिक्षा देण्यात आली आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. ‘अशा मुली ऊसाच्या शेतातच का सापडतात?’ हाथरस प्रकरणी भाजप नेता बरळला या नव्या प्रतिज्ञापत्रात राज्य सरकारने सांगितले की,  1 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचे निलंबन करण्यात आले आहे. तर 2 जणांना सेवा निवृत्तीवर पाठवले आहे.  तसंच 15 पोलीस कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात आणि दंडही ठोठवण्यात आला आहे.  त्याचबरोबर या प्रकरणात 252 जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सुप्रीम कोर्टामध्ये आज पालघर प्रकरणी महाराष्ट्र सरकारच्या वतीने प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले आहे. आता याप्रकरणी पुढील महिन्यात 15 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. काय आहे प्रकरण? 16 एप्रिल 2020 रोजी  कांदिवली येथील सुशीलगिरी महाराज, वाहन चालक निलेश तेलगडे आणि नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथील दक्षिण मुखी हनुमान मंदिराचे पुजारी कल्पवृक्षगिरी महाराज हे लॉकडाउनच्या काळात गुजरातकडे चालले होते.  चालकाची त्यांच्याकडे प्रवासाठीचा कोणताही पास नसल्याने त्यांना चारोटी टोलनाका येथून पोलिसांनी माघारी पाठवले. म्हणून ते माघारी फिरून आड मार्गाने विक्रमगडहून जव्हार-दाभाडीमार्गे दादरा नगर हवेलीच्या हद्दीवर असलेल्या डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास पोहचले.  मात्र, त्याठिकाणी वनविभागाच्या चौकीजवळ जमलेल्या एका जमावाने या तिघांची गाडी अडवली आणि चोर समजून दगड, कोयते, काठ्यांनी मारण्यास सुरूवात केली. हाथरस पीडितेची खरंच तुम्हाला चिंता? कदमांकडून काँग्रेस कार्यकर्त्यांच्या VIDEO जमावानं त्यांची कारही पलटी केली. गार्डने प्रसंगावधान राखून पोलिसांना सूचना दिली. रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास पोलीस आपल्या गाडीसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या तिघा जखमींना कारमध्ये बसवून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु, जमाव शेकडोंच्या संख्येने असल्याने तिथं उपस्थित चार पोलिसांचे काहीच चालले नाही. जमाव अधिकच आक्रमक झाला आणि त्यांनी थेट पोलिसांवरही हल्ला चढवला. या घटनेतून पोलिसांनी कशीबशी आपली सुटका करून घेतली. मात्र, त्या तीन जणांची जमावाने दगड, काठ्या, कोयत्याने वार करुन निर्घृणपणे हत्या केली. या घटनेचे देशभरात तीव्र पडसाद उमटले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात