मराठी बातम्या /बातम्या /देश /

बायको पळाली! शोधणाऱ्याला मिळणार 5 हजार रुपये; नवऱ्याने दिली ऑफर

बायको पळाली! शोधणाऱ्याला मिळणार 5 हजार रुपये; नवऱ्याने दिली ऑफर

फोटो सौजन्य - Canva

फोटो सौजन्य - Canva

पत्नी मुलासह बेपत्ता होताच पतीने सोशल मीडियावर पोस्ट करत मागितली मदत.

  • Published by:  Priya Lad

कोलकाता, 29 डिसेंबर : कुणी बेपत्ता झालं आहे आणि त्याला शोधणाऱ्या बक्षीस दिलं जाणार, अशा जाहिराती तुम्ही पाहिल्या असतील. पण एका नवऱ्याने मात्र चक्क आपली बायको पळून गेली (Wife run away with other man) आहे आणि तिला शोधणाऱ्याला बक्षीस देणार अशी पोस्ट सोशल मीडियावर केली आहे (Wife missing). पश्चिम बंगालमधील (West bengal) हे प्रकरण आहे. बायको मुलासह बेपत्ता झाली असून ती दुसऱ्या व्यक्तीसोबत पळून गेल्याचा संशय नवऱ्याला आहे (Husband offers Rs. 5000 for find his wife).

पिंगला गावात राहणारी ही व्यक्ती कार्पेन्टर आहे. माहितीनुसार तो कामानिमित्त हैदराबादला गेला होता. तेव्हा बायको, मुलं बेपत्ता झाल्याचं 9 डिसेंबरला त्याला समजलं. दुसऱ्याच दिवशीच तो त्यांना शोधण्यासाठी घरी परतला. गवेगळ्या ठिकाणी त्याने त्यांना शोधलं. पण ते काही सापडले नाहीत. अखेर त्याने सोशल मीडियाची मदत घेतली. सोशल मीडियावर पोस्ट करत त्याने नेटिझन्सनना आपल्याला मदत करण्याचं आवाहन केलं आहे.

फेसबुकवर त्याने पोस्ट केली आहे. त्याने पोस्टमध्ये म्हटलं, महिला आणि मुलगा 9 डिसेंबरपासून बेपत्ता आहेत. ज्यांना कुणाला ते दिसतील त्यांनी कृपया मला सांगावं. जो कुणी त्यांना शोधेल त्याला 5000 हजार रुपयांचं बक्षीस मिळेल.

हे वाचा - रक्तबंबाळ झाले, हाडं तुटली तरी कपल म्हणे, 'बरं झालं आमचा अपघात झाला'

पतीने सांगितलं की,  घरात बायको, मुलगा आणि आई-वडिल राहायचे. घरात कधीच मोबाईल फोन नव्हता.  एक व्यक्ती त्याच्या पत्नीसाठी मोबाईल फोन घेऊन आला होता. त्याच्यासोबत ती रात्री एकटी बोलत राहायची. त्याच्यासोबतच ती पळून गेली.  9 डिसेंबरला रात्री एक नंबर प्लेट नसलेली नॅनो कार त्याच्या परिसरात आली होती. त्याच गाडीतून ती पळून गेली असावी.

बायको एकटी खिडकी तोडू शकत नाही. त्यामुळे ज्याच्यासोबत ती पळाली त्याच्या मदतीने तिने खिडकी तोडली असावी. घराबाहेर पडण्यापूर्वी तिने पैसे, दागिने, वोटर आयडी, आधारकार्ड आणि मुलांचं जन्म प्रमाणपत्रही घेऊन गेली, असंही त्याने सांगितलं.

बायको आधीही पळू गेली होती. तिने भूतकाळात काय केलं याची पर्वा नाही. माझ्या पत्नीला लालच देण्यात आलं असावं. ती अशिक्षित असल्याने भुलली असावी. जर तिला मध्येच सोडलं असेल तर ती घरीसुद्धा येऊ शकणार नाही. आता ते दोघंही परत येतील याची वाट पाहतो आहे. ते लोक परत यायला हवेत, मला त्यांच्यासोबत राहायचं आहे.

हे वाचा - OMG! अजब प्रेमाची गजब कहाणी, पतीनं लावलं पत्नी आणि बॉयफ्रेंडचं लग्न

इंडिया टुडेने Ei Samay च्या हवाल्याने सांगितलं की  एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार कुटुंबाने याबाबत पोलिसांना कळवलं नाही. पण आपण पोलिसांना कळवल्याचा दावा पतीने केला आहे.

First published:

Tags: Couple, Relationship, Viral, West bengal, Wife and husband