कोलकाता, 2 डिसेंबर : मुंबई (Mumbai) आणि दिल्लीत (DelhI) कोरोना (Corona) आणि ओमायक्रोनबाधितांची (Omicron) संख्या वाढल्याने पश्चिम बंगाल सरकारने (West Bengal Government) एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई आणि दिल्लीहून कोलकातासाठी दररोज उड्डाण घेणाऱ्या विमानांवर आता बंदी (Restriction) घालण्यात आलीय. पश्चिम बंगाल सरकारने (West Bengal Government) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि दिल्लीहून कोलकाता विमानतळावर (Kolkata Airport) येणाऱ्या विमानांना आठवड्यातील फक्त दोन दिवसांसाठीच परवानगी दिली आहे. या दोन्ही शहरांमधून येणाऱ्या विमानांना फक्त सोमवार (Monday) आणि शुक्रवारसाठी (Friday) परवानगी देण्यात आली आहे. हे नियम 5 जानेवारीपासून लागू होतील, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. पश्चिम बंगाल सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज नवी नियमावली जारी केली. यामध्ये नाईट कर्फ्यूची देखील घोषणा करण्यात आली. राज्यात रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू राहील, असं सरकारकडून घोषित करण्यात आलं आहे. तसेच राज्यातील सर्व शाळा, कॉलेज, ब्युटी पार्लर, पर्यटनस्थळ, जीम बंद करण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच रेस्टॉरंट आणि सिनेमाहॉलसाठी 50 टक्के क्षमतांनी चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. पश्चिम बंगालमध्ये कोरोनाचा कहर, मिनी लॉकडाऊनची घोषणा महाराष्ट्र आणि केरळ पाठोपाठ सध्या पश्चिम बंगाल राज्यात कोरोनाचा उद्रेक बघायला मिळतोय. बंगालमध्ये शनिवारी (1 जानेवारी) तब्बल 4512 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. विशेष म्हणजे त्यादिवसाआधी 2351 रुग्ण आढळले होते. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग प्रचंड वेगाने होतोय, हे स्पष्टपणे दिसतंय. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता बंगाल सरकारने तातडीने राज्यात मिनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. राज्यात 3 जानेवारीपासून सर्व शाळा, महाविद्यालय, स्पा, ब्यूटीपार्लर, पार्क, चौपाट्या पूर्णपणे बंद असणार आहेत. हेही वाचा : राज्यातील सर्व सरकारी वाहनं आता इलेक्ट्रिकच असतील, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा पश्चिम बंगालचे मुख्य सचिव एचके द्विवेदी यांनी मिनी लॉकडाऊनबाबत माहिती दिलीय. राज्यातील सर्व खासगी आणि सरकारी कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांसाठी फक्त 50 टक्के उपस्थिती अनिवार्य राहील. तसेच सर्व प्रशासकीय बैठका या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होतील, अशी घोषणा त्यांनी केली. हेही वाचा : एकमेकांची उणी-दुणी काढण्यापेक्षा केंद्रातून निधी आणा, अजित पवारांचा टीका करणाऱ्या नारायण राणेंना सल्ला राजधानीत कोरोनाचा उद्रेक महाराष्ट्राची राजधानी असलेल्य मुंबईत कोरोनाचा सध्या उद्रेक आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या याआधीच्या दोन्ही कोरोनाच्या लाटांमध्ये मुंबईला मोठी झळ सोसावी लागली होती. त्याचप्रमाणे आता पश्चिम बंगालमध्येही तशीच परिस्थिती बघायला मिळत आहे. पश्चिम बंगालची राजधानी असलेल्या कोलकाता शहरात तर कोरोनाने अक्षरश: कहर केलेला आहे. कोलकातामध्ये काल 4512 रुग्ण आढळले होते. त्यापैकी 2398 रुग्ण हे एकट्या कोलकात्यात सापडले आहेत. त्याआधी कोलकात्यात 1954 नवे रुग्ण आढळले होते. रुग्णवाढीचा आलेख बघता सरकारने अखेर मिनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.