Home /News /pune /

एकमेकांची उणी-दुणी काढण्यापेक्षा केंद्रातून निधी आणा, अजित पवारांचा टीका करणाऱ्या नारायण राणेंना सल्ला

एकमेकांची उणी-दुणी काढण्यापेक्षा केंद्रातून निधी आणा, अजित पवारांचा टीका करणाऱ्या नारायण राणेंना सल्ला

नारायण राणेंच्या टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रत्युत्तर देत दिला खास सल्ला, म्हणाले...

नारायण राणेंच्या टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रत्युत्तर देत दिला खास सल्ला, म्हणाले...

Ajit Pawar advice to Narayan Rane: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आता अजित पवारांनी त्यावर भाष्य केलं आहे.

पुणे, 2 जानेवारी : सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या (Sindhudurg District Central Co operative bank) रणधुमाळीत राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचं पहायला मिळालं. या निवडणुकीपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सिंधुदुर्गाचा दौरा केला होता. या दौऱ्यावरुन केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता. नारायण राणे यांनी केलेल्या या टीकेनंतर आज अजित पवारांनी नारायण राणेंना प्रत्युत्तर देत एक सल्ला दिला आहे. त्यांना आमच्या शुभेच्छा उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, सिंधुदुर्ग मध्यवर्ती जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने चांगला प्रयत्न केला पण दुर्देवाने तेथे यश आले नाही. ज्यांना यश आले आहे त्यांचं मनापासून अभिनंदन.. त्यांनी बँक चांगली चालवावी अशा आमच्या शुभेच्छा. ते पण अनेक वर्षे मंत्रिमंडळात आहेत. कोकणात तौक्ते चक्रीवादळ आलं तेव्हा मदत केली. निसर्ग चक्रीवादळाच्या घटनेनंतर मदत केली. ज्या ज्या गोष्टी कोकणात करायला हव्यात त्या करम्याचा आमचा प्रयत्न आहे. एकमेकांच्या उणी दुणी काढण्यापेक्षा केंद्रात तुम्ही मंत्री आहेत तुमच्या परीने केंद्रातून निधाी आणावा. आम्ही आमच्या परीने राज्यातून निधी देऊ. अशाप्रकारे सर्व मिळून कोकणाचा विकास करू असंही अजित पवार म्हणाले. कोण अजित पवार? मी ओळखत नाही?  जिल्हा बँक निवडणुकीपूर्वी नारायण राणे यांनी अजित पवारांवर टीका केली होती. नितेश राणे यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करताना मांजराचा आवाज काढला. या प्रश्नावर पत्रकारांनी विचारले असता नारायण राणे संतप्त झाले आणि म्हणाले, विधिमंडळात कुठे केलं? पायरीवर बोलायला काही बंधने आहेत का? असंसदीय शब्द आहेत का? कोण अजित पवार मी ओळखत नाही अजित पवारला. या राज्यातील लोकांच्या कोट्यवधी रुपयांचा आरोप आहे त्यांचा रेफरन्स काय देता तुम्ही? अर्थमंत्री आले आणि पराभव करुन गेले सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यावर केंद्री मंत्री नारायण राणे हे कोकणात दाखल झाले. यावेळी नारायण राणे यांनी अजित पवारांवर टीका केली. राज्याचे अर्थखात्याचे मंत्री कोकणात येतात आणि तिन्ही पक्षांचा पराभव करुन जातता त्याला अक्कल म्हणतात असं वक्तव्य नारायण राणे यांनी केलं होतं. 'अक्कल असलेल्यांच्या हाती जिल्हा बँक' निवडणूक निकालानंतर नारायण राणे यांनी निकालानंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली. ज्यांना अक्कल आहे त्यांच्या हातात जिल्हा बँक आलेली आहे, असा टोला नारायण राणे यांनी लगावला. तसेच "मी सगळ्यांना पुरुन उरलोय. आता केंद्रापर्यंत पोहोचलोय. मी मध्ये थांबलो नाहीये", असं नारायण राणे म्हणाले होते.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Ajit pawar, Narayan rane, Sindhudurg

पुढील बातम्या