मुंबई, 2 जानेवारी : नववर्षाच्या सुरुवातीला राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मोठी घोषणा केली आहे. पेट्रोल-डिझेलच्या (Petrol- Diesel Vehicles) गाड्यांमुळे होणारं प्रदुषण (pollution) रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) मोठं पाऊल उचललं आहे. राज्यातील सर्व सरकारी वाहनं इलेक्ट्रिकच (EV) असतील, असं आदित्य ठाकरे यांनी घोषित केलं आहे. खरंतर राज्य सरकारने हा निर्णय याआधीच घेतला होता. या निर्णयाची अंमलबजावणी 1 एप्रिल 2022 पासून होणार होती. पण आता ही अंमलबजावणी 1 जानेवारी 2020 पासूनच होणार असल्याचं आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.
Keeping our commitment to clean mobility and encouraging citizens, the Govt of Maharashtra has decided to implement the decision of Purchasing or Renting only Electric Vehicles for Govt/ Urban Local Bodies/ Corporations from 1st January 2022 instead of 1st April 2022.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) January 2, 2022
आदित्य ठाकरे यांनी याबाबत ट्विटरवर माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे आभार मानले आहेत. आपल्या या निर्णयाला पाठींबा दिल्यानिमित्ताने त्यांनी तीनही ज्येष्ठ मंत्र्यांचे आभार मानले आहेत. पर्यावरण प्रदुषणविरहीत करण्यासाठी आपण हा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. हेही वाचा : एकमेकांची उणी-दुणी काढण्यापेक्षा केंद्रातून निधी आणा, अजित पवारांचा टीका करणाऱ्या नारायण राणेंना सल्ला पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून इलेक्ट्रिक वाहनं हे चांगले पर्याय आहेत, असं आदित्या ठाकरेंचं मत आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे याआधी अनेक इलेक्ट्रिक वाहनांशी संबंधित कार्यक्रमांमध्ये हजर राहिले आहेत. तसेच सरकार राज्यातील परिवहन विभागातही इलेक्ट्रिक वाहन सुरु करण्याच्या प्रयत्नात आहे. मुंबई महापालिकेच्या ‘बेस्ट’मध्ये याबाबतची सुरुवातदेखील झाली आहे. बेस्टमध्ये काही इलेक्ट्रिक बसेसची टप्प्याटप्प्याने सुरुवात करण्यात आली आहे. देशात इलेक्ट्रिक वाहनांची क्रांती होईल, गडकरींचं सूचक विधान केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Union Road Transport and Highways Minister Nitin Gadkari) यांनीदेखील काही दिवसांपूर्वी इलेक्ट्रिक वाहनांबद्दल मोठी घोषणा केली होती. देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात लवकरच क्रांती होईल, असा सूचक वक्तव्य त्यांनी केलं होतं. तसेच पेट्रोल आणि डिझेलचे भाव (Petrol- Diesel Prize) सध्या रोज वाढताहेत आणि ते आधीच आवाक्याबाहेर गेले आहेत. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या गाड्यांना अनेकजण पर्याय शोधत आहेत. इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय सध्या देशभरात (Electric Vehicles in India) चांगलाच लोकप्रिय होत आहे. सतत नवनव्या इलेक्ट्रिक कार आणि स्कूटर्स लाँच केल्या जात आहेत. अजून तरी या इलेक्ट्रिक गाड्यांच्या किंमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. त्यामुळे इलेक्ट्रिक गाड्यांचा पर्याय चांगला असला, तरी त्या घेण्याची सर्वसामान्यांची हिंमत होत नाही. आता मात्र हे चित्र बदलेल अशी शक्यता आहे. येत्या दोन वर्षांमध्ये इलेक्ट्रिक कार्सच्या किमती पेट्रोलवर चालणाऱ्या कार्सएवढ्याच होतील, असं गडकरी म्हणाले होते. याचाच अर्थ आता इलेक्ट्रिक गाड्यांच्या किंमती कमी होतील असे संकेत गडकरींनी दिले होते. हेही वाचा- पुण्यात इंजिनिअर मुलाकडून आईचा निर्घृण खून, आधी औषधांचा ओव्हर डोस दिला मग… ‘विजेवर चालणाऱ्या गाड्यांना प्रति किलोमीटर एक रुपया एवढाच खर्च’ इलेक्ट्रिक वाहनं कमी खर्चात जास्त अंतर कापू शकतात. त्यामुळेच भारतात इलेक्ट्रिक वाहनांची विक्री भरपूर होईल, अशी अपेक्षा नितीन गडकरींनी व्यक्त केली होती. ‘पेट्रोलवर चालणाऱ्या कारला प्रति किलोमीटर किमान 10 रुपये, डिझेलवर चालणाऱ्या कारला प्रति किलोमीटर किमान सात रुपये, तर विजेवर चालणाऱ्या गाड्यांना प्रति किलोमीटर एक रुपया एवढाच खर्च येतो,’ असं ते म्हणाले. अर्थातच हे सगळं चित्र आशादायी वाटतं. गॅसोलिन आणि डिझेलसारख्या पारंपरिक इंधनांवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी इथेनॉल आणि सीएनजीसारख्या पर्यायी इंधनांचा वापर केला जावा यावरही गडकरींनी भर दिला. इलेक्ट्रिक कार घेण्याची इच्छा आणि स्वप्न असणाऱ्यांसाठी गडकरींनी नक्कीच सकारात्मक बातमी दिली आहे.