कोलकाता, 13 मार्च: अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee Government) यांच्या सरकारमध्ये मोठी जबाबदारी असणाऱ्या यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये (TMC) प्रवेश केला आहे. वायपेयी सरकारमध्ये त्यांनी अर्थमंत्री म्हणून जबाबदारी हाताळली होती. पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता स्थित टीएमसी भवनात सिन्हा यांनी टीएमसीचे सदस्यत्व स्विकारलं. मोदी सरकारवरील नाराजी त्यांनी भाजपमध्ये असतानाही व्यक्त केली होती. 2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान (PM Narendra Modi) झाल्यानंतर सिन्हा नाराज होते. या नाराजीतूनच त्यांनी पक्षाचा राजीनामा देखील दिला होता.
अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या काळात सिन्हा यांनी अर्थ मंत्रालय आणि विदेश मंत्रालयाची जबाबदारी पार पाडली होती. यावेळी त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली की माझ्या निर्णयानंतर अनेकांना आश्चर्य वाटलं असेल. मी पार्टी आणि राजकारणापासून वेगळं झालो होतो पण आता देशाचे मूल्य संकटात आहे आणि त्यांचे पालन देखील होत नाही आहे. लोकशाहीची शक्ती आपल्या संस्थांमध्ये असते पण आज त्या दुर्बल झाल्या आहेत. देशाच्या न्यायव्यवस्थेचाही यात समावेश आहे. सिन्हा म्हणाले की, सरकारच्या मनमानीला आळा घालण्यासाठी आता कोणी उरलेले नाही.
Kolkata: Former BJP leader Yashwant Sinha joins Trinamool Congress, ahead of West Bengal Assembly elections pic.twitter.com/K3s9TQNPlS
— ANI (@ANI) March 13, 2021
यशवंत सिन्हा यांचे चिरंजीव जयंत सिन्हा हे अद्याप भाजपमध्ये आहेत. झारखंडमधल्या हजारीबाग मतदारसंघाचे ते खासदार आहेत. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात ते मंत्री होते. त्यावेळीही यशवंत सिन्हा यांच्याकडून सातत्याने मोदी सरकारवर टीका केल जात होती.
(हे वाचा-भाजपा आमदाराचा विधानसभेत आत्महत्येचा प्रयत्न, 'या' राज्यातील घटनेमुळे खळबळ)
टीएमसीला बहुमत मिळेल- सिन्हा
टीएमसी नेते सुदीप बंडोपाध्याय यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे की, सिन्हा यांच्या सहभागामुळे भाजपाविरोधातील टीएमसीची लढाई अधिक मजबुत झाली आहे. यावेळी सिन्हा असं म्हणाले की, 'यामध्ये कोणतीच शंका नाही आहे की, टीएमसी बहुमताने पुन्हा एकदा सत्तेत येईल. बंगालमधून देशाला एक संदेश गेला पाहिजे- जे मोदी आणि शाह दिल्लीतून करत आहे ते आता देश सहन करणार नाही.'
The country is facing an unprecedented situation today. The strength of democracy lies in the strength of the institutions of democracy. All these institutions including the judiciary have become weak now: Yashwant Sinha, TMC, in Kolkata pic.twitter.com/r0WMBqo7ug
— ANI (@ANI) March 13, 2021
निवडणूक आयोगावर केला गंभीर आरोप
सिन्हा यांनी निवडणूक आयोगावर देखील गंभीर आरोप केला आहे. ते म्हणाले की की, ' निवडणूक आयोग आता स्वतंत्र संस्था राहिली नाही आहे. तोडून मोडून निवडणूक (8 टप्प्यात होणारी निवडणूक) घेण्याचा निर्णय मोदी-शाह यांच्या नियंत्रणात घेण्यात आला आहे आणि भाजपला फायदा कसा होईल याची खबरदारी घेण्यात आली आहे.'
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Assembly Election 2021, Election, Mamata banerjee, PM narendra modi, TMC, Trinamool congress, West Bengal Election