दिल्ली, 07 मे : भारताच्या पूर्व किनारपट्टीला मोचा चक्रीवादळाचा धोका आहे. या आठवड्यात पश्चिम बंगाल आणि ओडिशात हे वादळ धडकेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. बंगालच्या खाडीत चक्रवाताची स्थिती तयार होत आहे. त्यामुळे 8 मे पर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. मोचा चक्रीवादळ पूर्व किनारपट्टीला धडकणार असले तरी याचा परिणाम देशातील इतर राज्यातही होणार आहे. हवामान विभागाचे महासंचलाकल मृत्युंजय महापात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 9 मे पर्यंत खाडीच्या दक्षिण-पूर्व दिशेला कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची आणि चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे. चक्रीवादळ मंगळवार किंवा बुधवारी उत्तरेच्या दिशेने मध्य बंगालच्या खाडीकडे जाईल. मच्छिमारांना इशारा देण्यात आला असून रविवारी 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. जे लोक बंगालच्या खाडीत दक्षिण-पूर्व दिशेला आहेत त्यांनी 7 मे च्या आधी आणि मध्य खाडीत असलेल्यांनी 9 मे आधी सुरक्षित ठिकाणी परतण्याचा सल्लाही हवामान विभागाने दिला आहे. गोव्यातील या बिचेसवर खरंच कपडे न घालता फिरता येतं? हे फॅक्ट्स तुम्हाला माहिती हवेच ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनीही मुख्य सचिवांना चक्रीवादळाची सतत माहिती घेण्यास आणि बारकाईने देखरेख करण्याचे आदेश दिले आहेत. सर्व विभागांसोबत समन्वयाने काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय संबंधित विभागांनी अलर्ट राहावं असंही सांगितलं आहे. मोचा चक्रीवादळामुळे मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, बिहार, झारखंड आणि पूर्व उत्तर प्रदेशच्या हवामानातही बदल होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तसंच मच्छीमारांनी पुढील चार दिवस समुद्रापासून दूर राहा असाही सावधानतेचा इशारा दिला आहे. पंजाब, हरयाणा आणि राजस्थान या तीन राज्यांत गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय केरळ, महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्येही मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.