जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / गोव्यातील या बिचेसवर खरंच कपडे न घालता फिरता येतं? हे फॅक्ट्स तुम्हाला माहिती हवेच

गोव्यातील या बिचेसवर खरंच कपडे न घालता फिरता येतं? हे फॅक्ट्स तुम्हाला माहिती हवेच

किनारपट्टीवर असलेल्या सुंदर बीचेसमुळे गोवा जगप्रसिद्ध आहे.

किनारपट्टीवर असलेल्या सुंदर बीचेसमुळे गोवा जगप्रसिद्ध आहे.

भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर वसलेल्या या राज्याला समृद्ध किनारपट्टी लाभलेली आहे. या किनारपट्टीवर असलेल्या सुंदर बीचेसमुळे गोवा जगप्रसिद्ध आहे.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 6 मे : गोवा हे भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वांत छोटं राज्य आहे. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर वसलेल्या या राज्याला समृद्ध किनारपट्टी लाभलेली आहे. या किनारपट्टीवर असलेल्या सुंदर बीचेसमुळे गोवा जगप्रसिद्ध आहे. भारतासह भारताबाहेरील लोकही गोव्याला भेट देण्यासाठी येतात. जे लोक अजून गोव्याला गेले नाहीत, त्यांच्या मनात गोव्याबद्दल अनेक प्रश्न आहेत. गोव्यातील बीचेस आणि बिअर विक्रीबाबत अनेक फॅक्ट्स शेअर केल्या जातात. त्यापैकी काही फॅक्ट्स बरोबर आहेत तर काहींमध्ये अजिबात तथ्य नाही. गोव्यातील ‘न्यूड बीच’बद्दल देखील अनेक प्रकारच्या चर्चा होतात. बर्‍याच लोकांचा असा समज आहे की, ज्या प्रकारे काही देशांमध्ये न्यूड बीचेस आहे, त्याचप्रमाणे गोव्यातही आहेत. ‘एबीपी’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

    राजकारणी लोक पांढरे कपडेच का घालतात माहितीये? कारण आहे खूप प्रेरणादायी

    गोव्यात असा एकही न्यूड बीच नाही, जिथे कपडे न घालता वावरता येईल. कायद्यानुसार भारतात न्यूडीटीबाबत अनेक नियम आहेत. या नियमांनुसार सार्वजनिक ठिकाणी कपड्यांशिवाय जाता येत नाही. त्यामुळे गोव्यातील कोणत्याही समुद्रकिनाऱ्याला ‘न्यूड बीच’ म्हणणं योग्य नाही. गोव्यात असे काही बीच आहेत, जे फार कमी लोकांना माहिती आहेत. बहुतांश परदेशी पर्यटक तिथे जातात आणि कमी कपड्यांमध्ये सनबाथ घेतात. याच कारणांमुळे या बीचेसबाबत पर्यटकांमध्ये चर्चा रंगतात आणि त्यांना न्यूड बीच म्हणतात.

    News18लोकमत
    News18लोकमत

    आरंबोल बीच : हा उत्तर गोव्यातील बीच आहे. गोव्यातील सुंदर समुद्र किनाऱ्यांमध्ये त्याचा समावेश होतो. त्यामुळे जगभरातील पर्यटक या ठिकाणी आकर्षित होतात आणि या बीचला भेट देतात. विशेषत: हिवाळ्याच्या दिवसांत या ठिकाणी जास्त गर्दी असते. हा बीच पाली या गोड्या पाण्याच्या तलावाच्या सान्निध्यात असल्यानं त्याला पर्यटकांची जास्त पसंती मिळते. या ठिकाणी कपडे कसे घातले पाहिजेत, याबाबत कोणतंही बंधन नाही, असं म्हटलं जातं. या ठिकाणची मातीही खास आहे. येणारे पर्यटक ही माती अंगावर लावून आंघोळ करतात.

    लग्नात मेहुण्या नवरदेवाचे शुज का लपवतात? या मागचं कारण माहितीय का?

    ओझरान बीच : गोव्याच्या ओझरान बीचवर सर्वांना एन्ट्री मिळते. पण, बहुतेकांना तिथे न्यूड किंवा सेमी न्यूड अवस्थेत जाणं आवडतं. गोव्याची राजधानी पणजीपासून 24 किलोमीटर अंतरावर हा बीच आहे. येथे पर्यटकांची गर्दी कमी असल्यानं हा बीच अतिशय शांत असतो. तसेच, गोपनीयता आणि सुरक्षिततेच्या कारणांमुळे तिथे फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीलादेखील बंदी आहे. असं असलं तरी, सोशल मीडिया किंवा युट्युबवर तुम्हाला येथील बरेच व्हिडिओ पाहता येतील. काही लोक येथे सनबाथ घेण्यासाठी येतात.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात