पियुष शर्मा, प्रतिनिधी मुरादाबाद, 10 जून : प्रवाशांनो…आता रेल्वेच्या प्रत्येक प्रमुख स्थानकावर पाण्याची बाटली केवळ 5 रुपयांना मिळणार आहे. तेदेखील पूर्णपणे शुद्ध आणि स्वच्छ पाणी प्यायला मिळेल. कारण वॉटर व्हेंडिंग मशीनची जबाबदारी आता थेट रेल्वे प्रशासनाच्या ताब्यात आली आहे. त्यामुळे प्रशासन रेल्वे विभागातील सर्व प्रमुख स्थानकांवर प्रवाशांना 5 रुपयांत बाटलीबंद पाणी उपलब्ध करून देणार आहे. सद्यपरिस्थितीत सर्व प्रमुख स्थानकांच्या सर्व फलाटांवर वॉटर व्हेंडिंग मशिन बसवण्यात आल्या आहेत. परंतु आतापर्यंत पाण्याच्या बाटलीची योजना यशस्वी झाली नव्हती. त्यामुळे सरकारच्या स्वच्छ पाणी योजनेनंतर आता रेल्वे प्रशासन पुन्हा नव्याने फलाटांवर वॉटर व्हेंडिंग मशीन बसवणार आहे. विभागीय रेल्वे प्रशासनाकडूनच ही जबाबदारी घेण्यात आली असून प्रत्येक मशीनच्या ठिकाण कर्मचारीही तैनात केले जाणार आहेत. प्रवाशांच्या मागणीनुसार त्यांना पाण्याच्या बाटल्या उपलब्ध करून दिल्या जातील.
पहिल्या टप्प्यात विभागीय रेल्वे प्रशासन प्रवासी संख्या जास्त असलेल्या स्थानकांवर ही सुविधा उपलब्ध करून देणार आहे. मग हळूहळू इतर राज्यांमध्ये या सुविधेचा विस्तार होईल. Eating Habits : तुम्हालाही पोटात गॅसचा त्रास होतो? मग रात्रीच्या जेवणात या भाज्यांचे सेवन टाळा देहरादून रेल्वे स्थानकावर लवकरच वॉटर व्हेंडिंग मशीन सुरू करण्यात येणार असल्याचं वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक सुधीर सिंह यांनी सांगितलं. ‘यावेळी योजना फसणार नाही याचीही काळजी घेण्यात आली आहे. ही सुविधा रेल्वे विभागातील इतर प्रमुख स्थानकांवर सुरू करण्यात येणार आहे’, असं ते म्हणाले.