मराठी बातम्या /बातम्या /देश /VIDEO: 'रुग्णांचा मृत्यू पाहून काळीज हलतं'; FB Live मध्ये डॉक्टरही आवरू शकले नाहीत अश्रू

VIDEO: 'रुग्णांचा मृत्यू पाहून काळीज हलतं'; FB Live मध्ये डॉक्टरही आवरू शकले नाहीत अश्रू

गेल्या वर्षीपेक्षा यंदा डॉक्टर्सची स्थिती खूपच वाईट असल्याचं त्यांनी सांगितलं. अनेक रुग्णांना पुरेशा सेवा पुरवता येत नसल्याबद्दल अनुभव सांगताना LIVE VIDEO मध्ये या डॉक्टरांना अक्षरशः अश्रू आवरले नाहीत.

गेल्या वर्षीपेक्षा यंदा डॉक्टर्सची स्थिती खूपच वाईट असल्याचं त्यांनी सांगितलं. अनेक रुग्णांना पुरेशा सेवा पुरवता येत नसल्याबद्दल अनुभव सांगताना LIVE VIDEO मध्ये या डॉक्टरांना अक्षरशः अश्रू आवरले नाहीत.

गेल्या वर्षीपेक्षा यंदा डॉक्टर्सची स्थिती खूपच वाईट असल्याचं त्यांनी सांगितलं. अनेक रुग्णांना पुरेशा सेवा पुरवता येत नसल्याबद्दल अनुभव सांगताना LIVE VIDEO मध्ये या डॉक्टरांना अक्षरशः अश्रू आवरले नाहीत.

    कोलकाता, 16 मे: कोरोनाबाधितांच्यासंख्येत दिवसेंदिवस वाढच होत असून,कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने गंभीरस्वरूप धारण केलं आहे. सोशल मीडियावरही (Social Media) दुःखद मेसेजेस दिसत आहेत. कोणीमदतीसाठी याचना करतंय,तर कोणाला औषधं हवी आहेत. लसीकरण हाच यावरचा एकमेवउपाय असला आणि लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाला असला,तरीही लशींच्या(Vaccines)तुटवड्यामुळे सर्वांना लशी उपलब्ध होत नाहीयेत. त्यातच गेल्या वर्षभराहूनअधिक काळ सातत्याने रुग्णसेवेत असलेल्या डॉक्टर्सचा धीरही आता सुटत चाललाआहे. गेल्या काही दिवसांत अनेक डॉक्टर्सनी फेसबुक किंवा अन्य सोशल मीडिवरआपली व्यथा मांडली आहे. त्यात आता आणखी एका डॉक्टरची भर पडली आहे.

    कोलकात्याचे (Kolkata) पल्मोनॉलॉजिस्ट (Pulomonologist) अर्थात फुप्फुसरोगतज्ज्ञ डॉ.अनिर्बन बिस्वास (Dr. Anirban Biswas)यांनी अलीकडेच फेसबुक लाइव्ह व्हिडिओद्वारे लोकांशी संवाद साधला. कोविड-19आजाराचं निदान लवकरात लवकरहोणं कसं गरजेचं आहे आणि त्यावर उपचार लगेचच का सुरू व्हायला हवेत,याबद्दलत्यांनी या व्हिडिओत सांगितलं आहे. अगदी थोडासा जरी उशीर झाला,तरीपरिस्थिती कशी बिघडते आणि वृद्धांसाठी कशी अत्यंत बिकट होते,याबद्दलत्यांनी या व्हिडिओतून सांगितलं आहे. हे सांगताना त्यांना आपलं रडू आवरताआलं नाही.

    कोविड योद्ध्या परिचारिकांचा अनोखा सन्मान; रुग्णालयाच्या डीनचं डोकं टेकून अभिवादन

    गेल्या वर्षीच्या परिस्थितीशी त्यांनी यंदाच्या भीषणपरिस्थितीची (Covid Second Wave) तुलना केली. गेल्या वर्षीपेक्षा यंदाडॉक्टर्सची स्थिती खूपच वाईट असल्याचं त्यांनी सांगितलं. अनेक रुग्णांनापुरेशा सेवा पुरवता येत नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.'रुग्णाचाजीव वाचवता आला नाही तर खूप दुःख होतं,'असं त्यांनी सांगितलं.

    लोकांनीकोविडसंदर्भातले सगळे नियम काटेकोरपणे पाळावेत,अशी हात जोडून विनंतीत्यांनी या फेसबुक लाइव्हदरम्यान(Facebook Live)केली. घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींना काहीत्रास दिसून आल्यास तातडीने उपचार मिळण्याची व्यवस्था करावी,असं आवाहनहीत्यांनी केलं. हे सांगताना त्यांना रडू आवरत नव्हतं.

    खरंच माणुसकी मेली; कोरोनामुळे मृत्यू झाल्याने शेतातील कांदा नागरिकांनी केला नष्ट

    सर्वांनी मानवतेचं दर्शन घडवायला हवं,एकत्र राहून या संकटाचा सामना करायला हवा,असा संदेशही त्यांनी या व्हिडिओद्वारे दिला आहे.

    डॉक्टरांनीलोकांना व्हिडिओद्वारे आवाहन करण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्यावर्षीपासून अनेक डॉक्टर्सनी अशा प्रकारे व्हिडिओ शेअर करून अत्यंत कठीणपरिस्थितीचं वर्णन केलं आहे. अनेकांनी ट्विट्स(Twits) किंवा फेसबुक पोस्ट्सहीकेल्या आहेत. तसंच,निदान ही परिस्थिती पाहून तरी लोकांनी कोरोनाविषयकनिर्बंधांचं पालन करावं असं आवाहन त्यांनी केलं आहे.

    दीपशिखा घोष याअतिदक्षता विभागात काम करणाऱ्या डॉक्टरने ट्विटमध्ये लिहिलं आहे, 'प्लीजमास्क परिधान करा. मला दुसऱ्या लोकांचं माहिती नाही,पण मी शारीरिक आणिमानसिकदृष्ट्या खूप एक्झॉस्ट झाले आहे. आतापर्यंतच्या माझ्या सेवाकाळात अशीवेळ कधीच आली नव्हती. ही परिस्थिती पाहूनही तुम्हाला पटत नसेल,तरमाझ्याऐवजी कोविड युनिटमध्ये(Covid Unite)काम करून पाहा,म्हणजे काय ते कळेल.'

    रुग्णांसाठी झटणाऱ्या डॉक्टरचा कोरोनाने घेतला घास; लेकाच्या निधनानंतर आईनेही...

    मुंबईतल्याडॉ. तृप्ती गिलाडा यांनीही अलीकडेच असा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाहोता. त्यात त्यांनी त्या स्वत:आणि सातत्याने सेवा देणारे इतरडॉक्टर्स कसे हतबल झाले आहेत,याबद्दल सांगितलंहोतं.

    First published:

    Tags: Coronavirus, Coronavirus cases, Kolkata