मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /कोविड योद्ध्या परिचारिकांचा अनोखा सन्मान; रुग्णालयाच्या डीननी डोकं टेकून केलं अभिवादन

कोविड योद्ध्या परिचारिकांचा अनोखा सन्मान; रुग्णालयाच्या डीननी डोकं टेकून केलं अभिवादन

कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून आरोग्य यंत्रणा अखंड राबते आहे. अनेक डॉक्टर्स, परिचारिका यांनी या आजारानं प्राण गमावले आहेत. तरीही कोणतीही कुरकुर न करता, रात्रंदिवस ते लोकांचा जीव वाचवण्यासाठी धडपडत आहेत.

कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून आरोग्य यंत्रणा अखंड राबते आहे. अनेक डॉक्टर्स, परिचारिका यांनी या आजारानं प्राण गमावले आहेत. तरीही कोणतीही कुरकुर न करता, रात्रंदिवस ते लोकांचा जीव वाचवण्यासाठी धडपडत आहेत.

कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून आरोग्य यंत्रणा अखंड राबते आहे. अनेक डॉक्टर्स, परिचारिका यांनी या आजारानं प्राण गमावले आहेत. तरीही कोणतीही कुरकुर न करता, रात्रंदिवस ते लोकांचा जीव वाचवण्यासाठी धडपडत आहेत.

    तामिळनाडू, 15 मे : कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत (Corona Virus Second Wave) देशभरात हाहाकार माजला आहे. अशावेळी आपलं घरदार विसरून जीवाचा धोका पत्करून अथक काम करत आहेत ते डॉक्टर्स, परिचारिका आणि आरोग्य कर्मचारी. कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून आरोग्य यंत्रणा अखंड राबते आहे. अनेक डॉक्टर्स, परिचारिका यांनी या आजारानं प्राण गमावले आहेत. तरीही कोणतीही कुरकुर न करता, रात्रंदिवस ते लोकांचा जीव वाचवण्यासाठी धडपडत आहेत.

    त्यांच्या या कामाचं,सेवा वृत्तीचं मोल कशानेच होऊ शकत नाही. विशेषतः परिचारिका या काळात करत असलेल्या सेवेचे योगदान अमूल्य आहे. आपलं घर, कुटुंब यापासून दूर राहत दिवस-रात्र त्या रुग्णांची सेवा करत आहेत. मूलभूत सोयीसुविधांची वानवा असूनही अनेक परिचारिका आपलं कर्तव्य बजावत आहेत. नुकत्याच झालेल्या परिचारिका दिनानिमित्त आणेल ठिकाणी परिचारिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

    रिपब्लिक वर्ल्ड डॉट कॉमनं दिलेल्या वृत्तानुसार, आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त (International Nurses Day) तमिळनाडूतील (Tamil Nadu)ईएसआय रूग्णालय(ESI Hospital)असलेल्या कोईम्बतूररूग्णालयाचे डीन(Dean)एम. रवींद्रन(M. Raveendran)यांनी तर तर चक्क जमिनीवर डोके टेकवून नमस्कार करत या परिचारिकांच्या सेवावृत्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या वेळी त्यांनी आधुनिक नर्सिंगचा(Modern Nursing) पाया घालणाऱ्याफ्लॉरेन्स नाईटिंगेल (Florence Nightingale) यांच्या क्रिमियन युद्धातील योगदानाला उजाळा देत,सध्याच्या कोरोना काळात परिचारिका देत असलेल्या योगदानाचे महत्त्व तितकंच अमूल्य असल्याचं सांगितलं.

    हे ही वाचा-मृतदेहाला मिठी मारून रात्रभर रडत होता छोटा भाऊ,सकाळी दोघांवर एकत्रच अंत्यसंस्कार

    ‘याच रुग्णालयात चार परिचारिकांना कोरोनाची लागण झाल्यानं दाखल करण्यात आलं आहे. हा आजार किती घातक आहे याचेच हे उदाहरण आहे. उद्या या आजारावर आपण मात करू तेव्हा सगळं श्रेय परिचारिकांचे असणार आहे. प्रयोगशाळेतील तंत्रज्ञ, कर्मचारी पॅरामेडिकल कर्मचारी यांचं नेतृत्व तुम्हीच करत आहात असं तेही सांगतील, असंही डॉ. रवींद्रन यांनी या वेळी सांगितलं.

    तामिळनाडूमध्ये वाढता संसर्ग :

    दरम्यान, तामिळनाडूमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर, नवनिर्वाचित मुख्यमंत्रीएम.के.स्टालिन(M.K.Stalin)यांचं सरकार राज्यात लॉकडाउन(Lockdown)आणखी तीव्र करण्याचा विचार करत असल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे. नव्या मार्गदर्शक सूचना देण्यासाठी एक समितीही स्थापन करण्यात आली असून, सध्या राज्यात दोन आठवड्यांचा लॉकडाउन सुरू आहे. तामिळनाडूत शुक्रवारी कोविड-19चे नवीन 31 हजार 892 रुग्ण आढळले. सध्या राज्यात एकंदर रुग्णसंख्या 15 लाख 31 हजार 377 झाली असून, गेल्या चोवीस तासात 288 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यत इथं 17 हजार 56 रुग्णांचा या आजारानं मृत्यू झाला आहे.

    First published:
    top videos

      Tags: Corona spread, Tamilnadu