मराठी बातम्या /बातम्या /पुणे /कुटुंबावर दुहेरी संकट; शेतकऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू तर दुसरीकडे शेतातील त्याचा कांदा समाजकंटकांनी केला नष्ट

कुटुंबावर दुहेरी संकट; शेतकऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू तर दुसरीकडे शेतातील त्याचा कांदा समाजकंटकांनी केला नष्ट

याउलट छोट्या आकाराचा कांदा कापताना त्रास होतो. कादा काल्यानंतर फार छोटा भाग वापरण्यायोग्य राहतो. यामुळे कांदा खरेदी करताना मीडियम साईजचा कांदा घ्यावा.

याउलट छोट्या आकाराचा कांदा कापताना त्रास होतो. कादा काल्यानंतर फार छोटा भाग वापरण्यायोग्य राहतो. यामुळे कांदा खरेदी करताना मीडियम साईजचा कांदा घ्यावा.

आज सकाळी कांद्यावरील पात बाजुला केली असता आतमध्ये संपूर्ण कांदा सडलेला दिसून आला.

    रायचंद शिंदे, प्रतिनिधी

    जुन्नर, 15 मे: माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार जुन्नर तालुक्यात (Junnar Tehsil) उघड झाला आहे. एकीकडे शेतकऱ्याचा कोरोनामुळे (farmer died due to corona) रुग्णालय मृत्यू झाला असताना त्याच्या मागे शेतात काढलेल्या कांद्यावर समाजकंटकानी युरिया मिश्रित पाणी टाकल्याने मोठं नुकसान झालं आहे. राजुरी येथील ही घटना आहे. शेतक-याच्या कांदा (Onion) आरणीवर अज्ञात व्यक्तीने युरिया टाकल्याने 150 पिशव्यां खराब होऊन एक लाख विस हजार रूपयांचे नुकसान झाले आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, राजुरी (ता.जुन्नर) येथील सुनिता सुनील हाडवळे यांची त्यांच्या घराजवळ असलेल्या शेतातच कांद्याची आरण होती. आज सकाळी पावसाचे वातावरण निर्माण झाल्यामुळे त्यांचे दिर विलास हाडवळे हे कागद टाकण्यासाठी कांद्याच्या आरणी जवळ गेले असता आरणीतील कांदा पुर्ण पणे सडुन त्याचा वास येत होता. तर त्यांना या आरणीवर काही प्रमाणात युरिया आढळून आला. त्यांनी कांद्यावरील पात बाजुला केली असता आतमध्ये संपूर्ण कांदा सडलेला दिसून आला.

    जवळपास दोनशे कांद्याच्या पिशवी भरतील एवढा कांदा या ठिकाणी होता. यापैकी फक्त विस ते पंचविस पिशव्या भरतील एवढाच कांदा थोड्य फार प्रमाणात राहिलेला आहे. या झालेल्या नुकसानीत जवळपास सध्या चालू असलेल्या बाजारभावानुसार एक लाख विस हजार रूपयांचे नुकसान झालेले आहे.

    वाचा: मृतदेहाला मिठी मारून रात्रभर रडत होता छोटा भाऊ, सकाळी दोघांवर एकत्रच झाले अंत्यसंस्कार

    दरम्यान सुनिता सुनील हाडवळे यांचे पती सुनील भगवंता हाडवळे यांचे परवा १३ मे रोजी कोरोनाने मुंबईत उपचार घेत असताना निधन झाले. घरातील सर्व जण खाजगी दवाखान्यात उपचार घेत असून घरची परिस्थिती अतिशय गरिबीची आहे. तसेच घरचा कर्ता माणुस गेल्याने दुसर्‍याच दिवशी अज्ञात व्यक्तीने केलेल्या नुकसाणीमुळे या कुटुंबावर मोठे संकट उभे राहिलेले आहे. या झालेल्या नुकसानीचा कृषी विभागाच्या कृषी अधिकारी राजश्री नरवडे तसेच तलाठी कुमावत यांनी पंचनामा केला असुन घटनास्थळी गावचे उपसरपंच माऊली शेळके, गौरव घंगाळे, विवेक शेळके, वल्लभ शेळके यांनी भेट दिली. तसेच दिवसेंदिवस कांदा आरणींवर युरिया टाकण्याचे प्रमाण तालुक्यात वाढत असुन असे कृत्य करणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

    First published:
    top videos

      Tags: Coronavirus, Onion, Pune