रुग्णांसाठी झटणाऱ्या डॉक्टरचा कोरोनाने घेतला घास; लेकाच्या निधनानंतर आईनेही सोडले प्राण

रुग्णांसाठी झटणाऱ्या डॉक्टरचा कोरोनाने घेतला घास; लेकाच्या निधनानंतर आईनेही सोडले प्राण

jamkhed pravin patil डॉ. पाटील यांचं शिक्षण जामखेडमधील खर्डा आणि वैद्यकीय शिक्षण बीडला झालं होतं. शहरात मोठी संधी असतानाही ग्रामीण भागात रुग्णसेवेचा वसा त्यांनी घेतला होता.

  • Share this:

अहमदनगर, 15 मे : संपूर्ण जगावर आलेल्या कोरोना महामारीच्या (Coronavirus) संकटानं आपल्यापासून सर्वात महत्त्वाचं काही हिरावून नेलं असेल तर ती म्हणजे आपल्या आजुबाजुला असलेली चांगली माणसं. प्रत्येक कुटुंबांसाठी त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती ही महत्त्वाची असते. मात्र काही असे लोकही असतात जे केवळ एका कुटुंबासाठी नव्हे तर संपूर्ण समाजासाठीच अनमोल असे असतात. अशाच एका चांगल्या वयक्तीला कोरोनानं आपल्यापासून हिरावून नेलं आहे.

(वाचा-'मराठ्यांचा एल्गार ठरला; लॉकडाऊन असला तरी मोर्चा रद्द होणार नाही!')

अहमदनगरच्या जामखेडमधील (Jamkhed) अनेक गावांमधील रुग्णांसाठी प्रत्यक्ष कुटुंबातील एक भाग असलेले असे डॉक्टर प्रवीण पाटील (Dr. Praveen Patil) यांचाच कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. रुग्णांची सेवा करताना कोरोनाची लागण त्यांना झाली आणि त्यातच त्यांचा अंत झाला. (Dr. Praveen patil died by corona ) डॉ. पाटील यांच्य आईलाही कोरोनाची लागण झाली होती. त्या कोरोनाशी झुंज देत होत्या. पण मुलाच्या निधनाची बातमी ऐकली आणि त्यांनीही धीर सोडला. त्यांनीही उपचारादरम्यान प्राण सोडले. त्यामुळं अनेकांच्या निरोगी आरोग्यासाठी झटणाऱ्या डॉक्टरच्या जाण्यानं समाजाचंच मोठं नुकसान झालं आहे.

(वाचा-Coronavirus: राज्यातील रिकव्हरी रेट वाढला, पण मृतकांचा आकडा चिंताजनक)

डॉ. प्रवीण पाटील हे जामखेडमधील जातेगाव आणि आसपासच्या गावांतील रुग्णांसाठी आदार बनले होते. रुग्णाकडे पैसे कमी आहेत किंवा नाहीत, याचा कधीही विचार डॉ. पाटील यांनी केला नाही. जातेगाव इथं रुग्णसेवा करत असताना जोडलेल्या दहा ते बारा गावांतील रुग्णांशी त्यांचा ऋणानुबंध जोडला गेला. अनेकांची आर्थिक स्थिती पाहून ते मोफत उपचारही देत होते. त्यामुळं अनेकांशी त्यांचं घरचं नातं बनलं. डॉ. पाटील यांचं शिक्षण जामखेडमधील खर्डा आणि वैद्यकीय शिक्षण बीडला झालं होतं. शहरात मोठी संधी असतानाही ग्रामीण भागात रुग्णसेवेचा वसा त्यांनी घेतला होता. सकाळने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

डॉ. पाटील यांनी 17 वर्षे या परिसरातील रुग्णांची सेवा केली. कोरोना काळातही सातत्यानं रुग्णांची सेवा करण्यात ते व्यस्त होते. यादरम्यानच त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यांच्याबरोबरच त्यांच्या पत्नी आणि त्यांच्या आईंनाही कोरोनाची लागण झाली. त्यांच्या पत्नीने कोरोनावर यशस्वीपणे मात केली. मात्र डॉ. पाटील आणि त्यांच्या आई यांचा कोरोनानं अंत केला. कोरोनामुळं अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, कुणाला घरं विकावी लागली असेल तर कुणाला आणखी मोठं नुकसान झालं असेल. हे नुकसान त्यांच्यासाठी मोठं आहेच. पण डॉक्टर पाटील यांच्यासारखे समाजाचे स्थैर्य राखणारे खांब जर एकामागून एक कोसळत राहिले, तर समाजाचा पाया खिळखिळा होईल, आणि ते आपल्याला परवडणारे नाही.

Published by: News18 Desk
First published: May 15, 2021, 9:43 PM IST

ताज्या बातम्या