मराठी बातम्या /बातम्या /देश /तुम्हालाही बदलायचा आहे मतदान ओळखपत्रावरील पत्ता? अशी आहे सोपी प्रक्रिया

तुम्हालाही बदलायचा आहे मतदान ओळखपत्रावरील पत्ता? अशी आहे सोपी प्रक्रिया

How to Change address on Voter ID: मतदान ओळखपत्रावरील पत्ता तुम्ही काही स्टेप्स फॉलो करून घरबसल्या बदलू शकता. जाणून घ्या काय आहे ही प्रक्रिया.

How to Change address on Voter ID: मतदान ओळखपत्रावरील पत्ता तुम्ही काही स्टेप्स फॉलो करून घरबसल्या बदलू शकता. जाणून घ्या काय आहे ही प्रक्रिया.

How to Change address on Voter ID: मतदान ओळखपत्रावरील पत्ता तुम्ही काही स्टेप्स फॉलो करून घरबसल्या बदलू शकता. जाणून घ्या काय आहे ही प्रक्रिया.

मुंबई, 12 जानेवारी: तुम्ही एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये शिफ्ट होणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. अशावेळी नवीन राज्यात मतदान ओळखपत्रावरील पत्ता (How to Change address on Voter ID) कसा, यासाठी कोणती कागदपत्र लागतील, प्रक्रिया काय आहे? असे अनेक प्रश्न यावेळी उपस्थित होतात. अशावेळी तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाही, कारण याठिकाणी तुम्ही या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ शकता. मतदान ओळखपत्रावरील पत्ता तुम्ही काही स्टेप्स फॉलो करून घरबसल्या बदलू शकता. जाणून घ्या काय आहे ही प्रक्रिया.

वर्षाच्या सुरुवातीला पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. तुम्ही पहिल्यांदाच मतदार (First time Voter) असाल तर तुमचे मतदार ओळखपत्र (how to make voter id) त्वरीत बनवा.

घरबसल्या बदला तुमच्या मतदार ओळखपत्रावरील पत्ता

>> सर्वप्रथम तुम्हाला नॅशनल व्होटर्स सर्व्हिस पोर्टलवर लॉग इन किंवा नोंदणी करावी लागेल.

>> यानंतर 'Correction of entries in electoral roll' हा विभाग निवडावा लागेल.

हे वाचा-Petrol-Diesel: आज काय आहे पेट्रोल-डिझेलचा भाव, एका क्लिकवर जाणून घ्या लेटेस्ट दर

>> नवीन पेज उघडल्यावर तुम्हाला फॉर्म 8 दिसेल, ज्यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल.

>> आता मतदार ओळखपत्रात दुरुस्तीचा पर्याय दिसेल.

>> येथे विचारलेली सर्व आवश्यक माहिती भरा आणि तुमचा पत्ता देखील भरा.

>> माहिती दिल्यानंतर तुम्हाला काही कागदपत्रे अपलोड करावी लागतील. ज्यात पत्ता पुरावा म्हणून आधार, परवाना समाविष्ट आहे.

>> आता तुम्हाला जी माहिती बदलायची आहे ती निवडायची आहे. जर त्यात नाव असेल तर नावाचा टॅब निवडा आणि आणखी काही असल्यास त्याचा टॅब निवडा. याठिकाणी तुम्हाला पत्ता बदलता येईल.

हे वाचा-Crypto संस्थापक झाला जगातल्या सर्वात श्रीमंतांपैकी एक; असा घडला प्रवास

>> आता तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर किंवा ईमेल अॅड्रेस सबमिट करावा लागेल

>> आता सबमिट पर्यायावर क्लिक करा. व्हेरीफिकेशन केल्यानंतर काही वेळात तुम्हाला मतदार ओळखपत्र पाठवले जाईल.

First published:
top videos

    Tags: Voters choice, Voting