Petrol-Diesel Price Today: आज काय आहे पेट्रोल-डिझेलचा भाव, एका क्लिकवर जाणून घ्या लेटेस्ट दर
Petrol-Diesel Price Today: आज काय आहे पेट्रोल-डिझेलचा भाव, एका क्लिकवर जाणून घ्या लेटेस्ट दर
File Photo
Petrol-Diesel Price Today: याठिकाणी जाणून घ्या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरात पेट्रोल आणि डिझेलचा दर काय आहे. त्याचप्रमाणे घरबसल्या तुम्ही तुमच्या क्षेत्रातील पेट्रोल-डिझेलच्या लेटेस्ट किमती कशाप्रकारे जाणून घेऊ शकता
मुंबई, 12 जानेवारी: सरकारी तेल कंपनी इंडियन ऑइल (IOCL) ने पेट्रोल-डिझेलचे नवीन दर (Petrol Diesel Price Today 12th January 2022) जारी केले आहेत. नवीन दरानुसार देशाची राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 95.41 रुपये प्रति लीटर आणि डिझेलचे दर 86.67 रुपये प्रति लीटरवर स्थिर आहेत. मुंबईत पेट्रोलचा भाव 109.98 रुपये तर डिझेलचा भाव 94.14 रुपये प्रति लीटर आहे. दरम्यान आज बुधवारी देखील इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
राज्यातील इंधनाचा दर
मुंबईत पेट्रोल-डिझेलचा भाव स्थिर असून गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल 109.98 रुपये तर डिझेलचा भाव 94.14 रुपये प्रति लीटर आहे. महाराष्ट्रातील इतर शहरातही महाराष्ट्रातील इतर शहरातही पेट्रोल-डिझेलच्या दरात किरकोळ बदल झाला आहे. पुण्यामध्ये पेट्रोलचे दर 110.19 रुपये प्रति लीटरवर आहेत, तर डिझेल 92.96 रुपये प्रति लीटरवर आहे. महाराष्ट्रात सर्वात महाग पेट्रोल परभणीमध्ये मिळते आहे. जाणून घ्या महाराष्ट्रातील इतर शहरात इंधनाचा दर काय आहे.
शहर
पेट्रोलचा भाव (प्रति लीटर)
डिझेलचा भाव (प्रति लीटर)
पुणे
110.19 रुपये
92.96 रुपये
मुंबई
109.98 रुपये
94.14 रुपये
नाशिक
110.13 रुपये
92.90 रुपये
नागपूर
109.70 रुपये
92.52 रुपये
अहमदनगर
109.55 रुपये
92.35 रुपये
औरंगाबाद
110.66 रुपये
93.41 रुपये
रत्नागिरी
111.56 रुपये
94.27 रुपये
रायगड
109.46 रुपये
92.23 रुपये
परभणी
113.19 रुपये
95.84 रुपये
पालघर
109.63 रुपये
92.39 रुपये
सांगली
109.65 रुपये
92.47 रुपये
कोल्हापूर
111.10 रुपये
93.86 रुपये
सकाळी 6 वाजता बदलतात इंधनाचे दर
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते.
हे वाचा-Crypto संस्थापक झाला जगातल्या सर्वात श्रीमंतांपैकी एक; असा घडला प्रवासअशाप्रकारे घरबसल्या तपासा इंधनाचे दर
पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (How to check diesel petrol price daily) च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. इंडियन ऑइलचे कस्टमर 92249 92249 वर SMS पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल. एचपीसीएल कस्टमर HPPrice लिहून 9222201122 या क्रमांकावर मेसेज पाठवून तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलची किंमत जाणून घेऊ शकतात.
Published by:Janhavi Bhatkar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.