ओट्टावा, 11 जानेवारी: मॅकडॉनल्डमधील (McDonald) साधी नोकरी (Job) ते क्रिप्टो करन्सी (Cryptocurrency) कंपनीचा जगातील सर्वात श्रीमंत संस्थापक (Richest Founder) हा चँपेन झाओ (Changpeng Zhao) यांचा प्रवास थक्क करणारा आहे. जगात जेव्हा कुणी क्रिप्टो करन्सीची कल्पनाही केली नव्हती, त्यावेळी चँपेन ही कल्पना प्रत्यक्षात उतरवत होते. बायनान्स या कंपनीच्या सीईओ पदाची जबाबदारी सांभाळणारे आणि CZ या नावाने जगभर लोकप्रिय असणारे चीनी-कॅनेडियन चॅपेन झाओ यांनी आता जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान मिळवलं आहे. ब्लुमबर्गनं केलेल्या सर्वक्षणातून ही बाब पुढं आली आहे. मिळवली इतकी संपत्तीआतापर्यंत CZ यांच्या नावावर 96 बिलियर डॉलर एवढी संपत्ती आहे. भारतीय चलनात याचा विचार केला तर हा आकडा होतो 7 लाख 9 हजार 104 कोटी रुपये. बरं, ही केवळ कंपनीच्या माध्यमातून त्यांनी केलेली कमाई आहे. त्यांची क्रिप्टो करन्सीमधील वैयक्तिक गुंतवणूक यात मोजण्यात आलेली नाही. त्यांच्याकडे असणारे बिटकॉईन्स आणि बायनान्स कॉईन्स यांचीही मोजणी त्यांच्या जाहीर झालेल्या संपत्तीत करण्यात आलेली नाही. जगात अकरावा क्रमांकCZ यांच्या सध्याच्या मालमत्तेनुसार त्यांना जगातील श्रीमंतांच्या यादीत अकरावा क्रमांक देण्यात आला आहे. 44 वर्षांच्या CZ यांनी या मानांकनासह आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानींनाही मागे टाकलं आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गजांच्या तुलनेत मात्र CZ मागे असून त्यांच्याशी स्पर्धा कऱण्यासाठी बरीच प्रतिक्षा करावी लागेल, असं ब्लुमबर्गच्या यादीतून दिसून आलं आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असणारे ‘टेस्ला’ कंपनीचे सीईओ एलॉन मस्क यांच्या नावे 263 मिलियन डॉलरची मालमत्ता आहे, तर झुकरबर्ग, पेज आणि ब्रिन हे अनुक्रमे पाचव्या, सहाव्या आणि सातव्या स्थानी आहेत. बायनान्सच्या यशाचं रहस्यजगभरातील बहुतांश देशांमध्ये क्रिप्टो करन्सीला परवानगी मिळवून देण्यासाठी CZ यांनी अविरत परिश्रम केल्याचं यश त्यांना मिळालं आहे. क्रिप्टो व्हिसा कार्ड प्रोव्हायडर असणाऱ्या स्वाईप या कंपनीची खरेदी करून CZ यांनी धोरणात्मक निर्णय़ घेतल्याचं मानलं जातं. जगभरातील 7 कोटी ठिकाणं या कंपनीमार्फत ऑपरेट केली जात असल्याची माहिती आहे. गेल्या एका वर्षातच बायनान्स कंपनीच्या क्रिप्टो कॉईनच्या किंमतीत तब्बल 1300 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.
हे वाचा -
संपत्ती करणार दानजगभरातील इतर कोट्यधीशांप्रमाणेच CZ यांनीदेखील आपली संपत्ती दान करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी मार्क झुकरबर्ग, बिल गेट्स, वॉरन बफे यासारख्या जगातील श्रीमंतांनी आपल्याला मिळालेली संपत्ती ही लोककल्याणासाठी देण्याचा निर्णय़ जाहीर केला आहे. त्याच सुरात सूर मिसळत CZ यांनीही आपली संपत्ती समाजकार्यासाठी दान करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
Published by:desk news
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.