जाहिरात
मराठी बातम्या / देश / 'मला सर नाही, बॉस म्हणायचं;' VIRAL VIDEO मुळे चर्चेत आले नवे रेल्वेमंत्री

'मला सर नाही, बॉस म्हणायचं;' VIRAL VIDEO मुळे चर्चेत आले नवे रेल्वेमंत्री

'मला सर नाही, बॉस म्हणायचं;' VIRAL VIDEO मुळे चर्चेत आले नवे रेल्वेमंत्री

उपस्थित असलेला एक कर्मचारी म्हणाला, की ‘सर आम्ही ठरवतच होतो, की जेव्हा तुम्हाला भेटू तेव्हा तुम्हाला सांगायचं, की आपण एकाच कॉलेजमध्ये शिकलो आहोत.’ त्यावर रेल्वेमंत्री म्हणाले, ‘मला सर नाही, बॉस म्हणायचं.

नवी दिल्ली 10 जुलै : बुधवारी (7 जुलै 2021) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला आहे. 36 नव्या चेहऱ्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात (Cabinet Expansion) संधी मिळाली आहे. त्या प्रत्येकाबद्दलची माहिती माध्यमांत प्रसिद्ध होत आहे. सर्वांत जास्त चर्चेत आहेत, ते नवे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Railways Minister Ashwini Vaishnaw). कारण मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारल्यापासूनच ते फुल फॉर्ममध्ये दिसत आहेत. पहिल्याच दिवशी त्यांनी घोषणा केली, रेल्वेचे कर्मचारी आता दोन शिफ्ट्समध्ये काम करतील. सकाळची शिफ्ट सकाळी सात ते सायंकाळी चारपर्यंत असेल, तर दुपारची शिफ्ट दुपारी तीन ते मध्यरात्री 12पर्यंत असेल, अशी माहिती त्यांनी दिली. त्यांचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे. ते एका रेल्वे इंजिनीअरला सांगत आहेत, की ‘मला सर नाही, बॉस म्हणा,’ असं त्या व्हिडिओत दिसत आहे. अश्विनी वैष्णव यांचा गुरुवारी रेल्वेमंत्री म्हणून कामाचा पहिला दिवस होता. पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी आपल्या मंत्रालयातल्या कर्मचाऱ्यांची भेट घेतली. ‘आपण सगळे मिळून एकदम चांगलं काम करू या. खूप मजा येईल. आपल्याला आयुष्यात वाटलं पाहिजे, हा. खूप चांगलं काम केलं. मजा आली,’ असं ते कर्मचाऱ्यांना उद्देशून म्हणाले. केवळ ‘या’ दोन राज्यांमुळे देशावर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं संकट? तेवढ्यात तिथे उपस्थित असलेल्या एका कर्मचाऱ्याने दुसऱ्या एका कर्मचाऱ्याकडे अंगुलिनिर्देश करत म्हटलं, की ‘सर आम्ही कालच बोलत होतो, की आमचा हा सहकारीसुद्धा त्याच कॉलेजमध्ये शिकला आहे, जिथे तुम्ही शिकला आहात.’ हे ऐकून रेल्वेमंत्री अत्यंत खूश झाले. त्यांनी त्या इंजिनीअरला विचारलं, ‘MBMमधून शिक्षण घेतलंयत?’ त्यानंतर रेल्वेमंत्र्यांनी त्या इंजिनीअरला जवळ बोलावलं आणि आलिंगन दिलं. हे पाहून बाकीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवल्या.

जाहिरात

त्यानंतर तिथे उपस्थित असलेला एक कर्मचारी म्हणाला, की ‘सर आम्ही ठरवतच होतो, की जेव्हा तुम्हाला भेटू तेव्हा तुम्हाला सांगायचं, की आपण एकाच कॉलेजमध्ये शिकलो आहोत.’ त्यावर रेल्वेमंत्री म्हणाले, ‘मला सर नाही, बॉस म्हणायचं. आमच्या कॉलेजमध्ये ज्युनिअर विद्यार्थी सीनियरला सर नाही, बॉस म्हणतात. त्यामुळे तुम्ही मला बॉसच म्हणायचं.’ मोठी दुर्घटना; नदीत स्नानासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 12 जणं बुडाले रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव हे मूळचे राजस्थानमधील जोधपूरचे असून, माजी आयएएस अधिकारी (Former Indian Administrative Service officer) आहेत. 1994मध्ये ते आयएएस परीक्षा उत्तीर्ण झाले. जोधपूरमधल्या एमबीएम (MBM) कॉलेजमधून त्यांनी बीटेक (B.TECH) ही पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी ‘आयआयटी कानपूर’मधून एमटेक (M.TECH) केलं आणि नंतर अमेरिकेतल्या एका मोठ्या कॉलेजमधून एमबीए (MBA) केलं. 2003 मध्ये त्यांनी सरकारी नोकरी सोडून काही वर्षं स्वतःचा बिझनेस केला. त्यानंतर त्यांनी राजकीय क्षेत्रात प्रवेश केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात