आग्रा, 9 जुलै : अयोध्यातील (Ayodhya) गुप्तार घाटात एकाच कुटुंबातील तब्बल 12 जणं बुडाल्याचं वृत्त समोर आलं आहे. हे कुटुंब सरयू नदीत स्नान करण्यासाठी गेले होते. तेव्हा हा प्रकार घडला आणि 12 जणं बुडाले. या दुर्घटनेत तीन जणांचा वाचविण्यात यश आलं असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. (Twelve members of the same family drowned while bathing in the river) हे कुटुंब आग्राचं असल्याचं सांगितलं जात आहे. सरयू नदीत स्नान करण्यासाठी ते गुप्तार घाटाजवळ आले होते. मात्र तेथे पाण्याच्या प्रवाहाला गती होती. त्यात सुरुवातील काही लोक बुडाले. त्यांचा वाचविण्यासाठी नदीत उडी मारलेले देखील आत अडकले. आणि अशात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एकाच कुटुंबातील 12 जणांच्या बुडालेल्या वृत्तामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. एकाच कुटुंबातील 12 जणं बुडाले.. स्थानिकांना लोकांचा आवाज ऐकल्यानंतर ते मदतीसाठी पुढे आले. सुरुवातील त्यांनी पोलिसांनी या बाबत कळवलं. यानंतर तेथे रेस्क्यू टीम पोहोचली. त्यांनी रेस्क्यूचं काम सुरू केलं. हे ही वाचा- किन्नराने केली 3 महिन्यांच्या मुलीची हत्या; घरी आशीर्वाद देण्यासाठी आली आणि… वाचवलेल्यांची नावं – सतीश, नमन आणि अशोक मृतांची नावं – सतीशची पत्नी आरती (35), मुलगी प्रियांशी (16), मुलगा ललित, दुसरा मुलगा पंकड, अशोकची पत्नी राजकुमारी, मुलगी गौरी, दुसरी मुलगी जुली आणि 7 वर्षीय धैर्य याशिवाय 20 वर्षीय श्रुती, 16 वर्षीय सार्थक आणि 35 वर्षीय सीता, आणि सीताची 4 वर्षीय मुलीचाही समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार कुटुंबातील एक-एक सदस्य बुडत होतं. मात्र पाण्याच्या प्रवाहासमोर कोणीच पुढे गेलं नाही. त्यात अशोक मदतीसाठी पुढे गेला मात्र तो फार पुढे जाऊ शकला नाही. स्थानिकांनी त्यांचा हात पकडल्यामुळे तिघेजणं वाचू शकले. पावसाळ्यात बुडून मृत्यूच्या घटना वारंवार पाहायला मिळतात. त्यामुळे अशा वेळात नदी वा इतर ठिकाणी जाताना अधिक काळजी घेणं आवश्यक आहे. उत्साहाच्या भरात नदीत वा समुद्रात पोहोयला जाणं जीवावर बेतू शकतं, हे लक्षात ठेवायला हवं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.