मराठी बातम्या /बातम्या /देश /

ISIS या दहशतवादी संघटनेतील केरळच्या तरुणीने जारी केला व्हिडीओ, म्हणाली भारतात परत यायचंय!

ISIS या दहशतवादी संघटनेतील केरळच्या तरुणीने जारी केला व्हिडीओ, म्हणाली भारतात परत यायचंय!

 आयशाने एका व्हिडीओच्या (Video) माध्यमातून इसिसमधील (ISIS) सत्य समोर आणलं आहे.

आयशाने एका व्हिडीओच्या (Video) माध्यमातून इसिसमधील (ISIS) सत्य समोर आणलं आहे.

आयशाने एका व्हिडीओच्या (Video) माध्यमातून इसिसमधील (ISIS) सत्य समोर आणलं आहे.

    कोची, 17 मार्च : केरळमध्ये राहणारी आयशा उर्फ ​​सोनिया सेबॅस्टियन 2016 मध्ये (ISIS) इसिस या दहशतवादी संघटनेत सामील झाली होती. मात्र या संघटनेत आयशाचा अपेक्षाभंग झाला आहे. तिने एका व्हिडीओच्या (Video) माध्यमातून इसिसमधील (ISIS) सत्य समोर आणलं आहे. तिचं म्हणणं आहे की आयएसआयएसआय अपेक्षेप्रमाणे नाही. आयशाने एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये तिने म्हटले आहे की, इसिसचे जिहादी मशिदीतदेखील जात नाहीत. आयशा म्हणाली की, तिला भारतात परत यायचे आहे आणि तिथेच राहायचे आहे. हे वाचा - घाबरू नका, काळजी घ्या; भारत अद्यापही कोरोनाव्हायरसच्या दुसऱ्या टप्प्यात आयशाने 2016 मध्ये केरळ सोडले आणि अफगाणिस्तानात इसिसमध्ये रुजू झाली. आता आयशाने एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. आयशा म्हणाली की, आयुष्याच्या शेवटच्या क्षणांमध्ये माझे पती अब्दुल रशिद अब्दुल्लाही आयएसआयएसमुळे निराश झाले होते. आयशा सध्या काबूलच्या तुरुंगात बंद आहे. आयशासोबत इतर अनेक महिलादेखील आहेत. ज्यांनी काही महिन्यांपूर्वी आत्मसमर्पण केलं होतं. आयशाने दिला सल्ला, इसिसमध्ये जाण्यापूर्वी दोनदा विचार करा व्हिडीओमध्ये आयशाने म्हटलं आहे की, 'मला आता इसिसबरोबर राहायचं नाही. मला विश्वास आहे की, ज्यांना इसिसमध्ये येण्याची इच्छा आहे  त्यांनाही कालांतराने येथे आल्यावर हेच वाटेल. येथे येण्यापूर्वी त्यांना त्यांच्या निर्णयाबद्दल दोनदा विचार करण्याचा सल्ला मी देऊ इच्छिते. ' आयशा पुढे म्हणाली, 'आम्ही खलिफाच्या अंतर्गत इस्लामिक स्टेटसाठी इसिसमध्ये सामील झालो होतो. पण आम्हाला नंतर कळलं की, इथले लोक मशिदीतही जात नाहीत. हे वाचा - हुंडा दिला नाही म्हणून काँग्रेस नेत्याने सुनेवर केले वार, मुलालाही दिली शिक्षा आयशा म्हणाली की, हे सर्व पाहिल्यानंतर तिचा नवरा निराश झाला होता. त्याने ऑडिओ संदेश तयार करणं आणि पाठवणं बंद केले होतं. यापूर्वी आयशाचा पती रशिद हा मल्याळी भाषेत संदेश रेकॉर्ड करत असत आणि ते इतर लोकांना पाठवत असतं. आयशा पुढे म्हणाली की, तिला भारतात परत यायचे आहे आणि रशिदच्या कुटुंबासोबत राहायचे आहे. या व्हिडीओमध्ये दिसणारी आणखी एक महिला फातिमा उर्फ ​​निमिषा म्हणाली की, तिलाही भारतात परत यायचे आहे. ती म्हणाली, 'अफगाणिस्तानात मी राहू शकत नाही. मला भारतात यायचं आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: ISISI, Keral

    पुढील बातम्या