घाबरू नका, काळजी घ्या; भारत अद्यापही कोरोनाव्हायरसच्या दुसऱ्या टप्प्यात
भारत (India) कोरोनाव्हायरसच्या (coronavirus) दुसऱ्या टप्प्यात असला, तरी नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असं आवाहन इंडियन काऊन्सिल मेडिकल रिसर्चने (ICMR) केला आहे.
नवी दिल्ली 17 मार्च : भारतात (India) कोरोनाव्हायरस (Coronavirus) रुग्णांची संख्या वाढत असली, तरी नागरिकांनी घाबरून जाण्याचं कारण नाही. कारण भारतात कोरोनाव्हायरस अद्यापही दुसऱ्या टप्प्यात (second stage) आहे, असा दिलासा केंद्र सरकारने दिला आहे.
देशातील कोरोनाव्हायरस रुग्णांची आकडेवारी आणि एकूण परिस्थिती पाहता कोरोनाव्हायरस दुसऱ्या टप्प्यात आहे, असा दिलासा इंडियन काऊन्सिल मेडिकल रिसर्च (ICMR) ने दिला आहे.
We are in stage 2 (local transmission): DG ICMR Balram Bhargava on coronavirus outbreak
इंडियन काऊन्सिल मेडिकल रिसर्चने (ICMR) कोरोनाव्हायरसबाबत पत्रकार परिषद घेतली. यावेळी डॉ. भार्गव म्हणाले, "आपण कोरोनाव्हायरसच्या दुसऱ्या टप्प्यात आहोत. पहिल्या टप्प्यात कोरोना बाहेरील देशातून येतो. दुसऱ्या टप्प्यात कोरोनाग्रस्त रुग्ण देशातील इतरांना संक्रमित करण्यास सुरुवात करते. हे संक्रमण बाधित व्यक्तीशी जवळच्या संपर्कापुरते मर्यादित आहे"
"आपण कोरोनाव्हायरसच्या दुसऱ्या टप्प्यात आहोत हे आपणा सर्वांना माहिती आहे. आपण तिसऱ्या टप्प्यात नाही, हे स्पष्ट आहे. तरीदेखील खबरदारी घ्यायला हवी. यासाठी आता खासगी प्रयोगशाळेतही चाचणी सुरू व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. NABL मान्यताप्राप्त खासगी प्रयोगशाळेत लवकरच कोरोनाव्हायरसच्या चाचणी सुरू केल्या जातील", असं डॉ. भार्गव यांनी सांगितलं.
Private NABL accredited laboratories will soon be operationalised: ICMR DG Balram Bhargava
भारतात कोरोनाव्हायरस रुग्णांची एकूण संख्या 137 झाली आहे, ज्यामध्ये 24 परदेशींचा समावेश आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त 40 प्रकरणं आहेत. भारतात 3 जणांचा मृत्यू झाला आहे, त्यामध्ये महाराष्ट्रातील एका रुग्णाचा समावेश आहे