मराठी बातम्या /बातम्या /देश /

हुंडा दिला नाही म्हणून काँग्रेस नेत्याने सुनेवर केले वार, मुलाचेही हात धडापासून केले वेगळे

हुंडा दिला नाही म्हणून काँग्रेस नेत्याने सुनेवर केले वार, मुलाचेही हात धडापासून केले वेगळे

मुलगा पत्नीला वाचवण्यासाठी मध्ये आला होता. तोच त्याच्या हातावर वार करण्यात आला.

मुलगा पत्नीला वाचवण्यासाठी मध्ये आला होता. तोच त्याच्या हातावर वार करण्यात आला.

मुलगा पत्नीला वाचवण्यासाठी मध्ये आला होता. तोच त्याच्या हातावर वार करण्यात आला.

  • Published by:  Meenal Gangurde
नवी दिल्ली, 17 मार्च : गुरुग्राममधील सोहना येथील रिठौजा या गावात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका वडिलांनी तलवारीने आपल्या मुलावर व सुनेवर हल्ला केला. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. दोघांनाही गुरुग्राममधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रुग्णालयात दाखल असलेल्या सूनेची प्रकृती गंभीर आहे. या प्रकरणात काँग्रेसचे (Congress) प्रदेश सरचिटणीस यांच्यावर हल्ल्याचा आरोप आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. हे वाचा - टेंटमध्ये नाही, बुलेटप्रुफ मंदिरात विराजमान होणार रामलल्ला; कधी होणार स्थापना? मिळालेल्या माहितीनुसार, हुंड्याची मागणी पूर्ण न झाल्याने रिठौज गावातील कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ओमवीर यांनी त्यांच्या सुनेवर तलवारीने हल्ला केला. पत्नीवर झालेला हल्ला पाहून पती बचावासाठी आला असता, ओमबीर यांनी त्यांच्यावरही हल्ला केला. या हल्ल्यात पती-पत्नी दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ओमवीर सिंग गेल्या दोन वर्षांपासून हुंड्यासाठी आपल्या सुनेला त्रास देत होते आणि हुंडा मागण्याची मागणी पूर्ण न झाल्याने त्यांनी सूनेवर हल्ला करीत तलावरीचे सपासप वार केले आणि घटनास्थळापासून पळ काढला. सध्या दोन्ही जखमींना गुरुग्राम येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पीडितेची प्रकृती अत्यंत नाजूक असून मुलाचे हात कापल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या मुलीच्या कुटुंबाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपीचा शोध सुरू केला आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, पीडितेची प्रकृती चिंताजनक असून त्यांची प्रकृती सुधारल्यास पुढील कारवाई केली जाईल. दोषीला शिक्षा देताना कोणत्याही राजकीय पक्षाची पर्वा केली जाणार नाही. हे वाचा - कोरोनाचा परिणाम प्लॅटफॉर्म तिकीटांवर, गर्दी टाळण्यासाठी दर 10 वरून थेट 50 रुपये
First published:

Tags: Congress

पुढील बातम्या