पणजी, 26 ऑक्टोबर: तृणमूल काँग्रेस सुप्रीमो आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी (Mamta Banerjee visit to Goa in 2021) 28 ऑक्टोबरपासून गोव्याच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान एक महत्त्वाची अपडेट घडण्याची सूत्रांची माहिती आहे. प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री वर्षा उसगांवकर तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश (Varsha Usgaonkar likely to Join TMC) करतील अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे.
तृणमूल काँग्रेसकडून वर्षा (Varsha Usgaonkar TMC) यांच्यावर मोठी जबाबादरी देखील सोपवली जाऊ शकते. अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांना राजकीय वसाही लाभला आहे, त्या एका राजकीय कुटुंबातील आहेत. त्यांचे वडील अच्युत के. एस उसगांवकर हे गोव्यातील महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे मोठे नेते होते. ते गोवा विधानसभेचे उपसभापती आणि एकापेक्षा जास्त वेळा मंत्रिमंडळाचे सदस्य होते. मंत्री होण्यापूर्वी अच्युत उसगांवकर यांनी दयानंद बांदोडकर यांच्या नेतृत्वात सरकार असताना गोव्याचे उपसभापती म्हणून काम केले. त्यामुळे वर्षा यांना राजकारणाचे बाळकडू लहानपणीच मिळाले आहे असे म्हटले तरी वावगं ठरणार नाही.
हे वाचा-मुंबई विमानतळावर लाखोंचं सोनं जप्त, SMUGGLING ची पद्धत वाचून येईल चक्कर
मराठी चित्रपट, मालिका शिवाय बॉलिवूडमध्येही वर्षा उसगांवकर यांनी छाप सोडली आहे. सध्या त्यांची 'सूख म्हणजे नक्की काय असतं...' ही मालिका देखील विशेष गाजते आहे. आता त्या राजकारणात एंट्री घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे ही जबाबदारी वर्षा उसगांवकर कशी सांभाळतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. वर्षा उसगावकर हा केवळ महाराष्ट्रच नव्हे तर गोव्यातीलही प्रसिद्ध चेहरा आहे. आता त्या तृणमूल काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चिन्ह आहेत. शिवाय आगामी काळात आणखी काही महत्त्वाचे चेहरे तृणमूलमध्ये येतील असा विश्वास पार्टीला आहे.
हे वाचा-एका गोष्टीमुळे अमित शहांनी पुन्हा जिंकली काश्मिरी जनता; त्या VIDEOची मोठी चर्चा
75% हिंदू मतदार असलेल्या गोव्यात हिंदू चेहरा आल्यास तृणमूल काँग्रेसला फायदा होईल, असे मत राजकीय वर्तुळात मांडले जात आहे. तर दुसरीकडे नफिसा अली सोधी, लकी अली आणि रेमो फर्नांडीज यांची नावे काही दिवसांपासून चर्चेत आहेत. ते ममता बॅनर्जींना पाठिंबा देऊ शकतात. तृणमूलचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी यापूर्वीच नफिसा आणि लकी अली यांची भेट घेतली आहे. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांचीही टीएमसीच्या विस्तारात महत्त्वाची भूमिका आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mamta Banerjee, TMC