दरम्यान जम्मू आणि काश्मीरमधील सुरनकोट (पुंछ) आणि राजौरी जिल्ह्यातील थानामंडीच्या शेजारील वनक्षेत्रात गेल्या 15 दिवसांपासून भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. काही काळ गोळीबार थांबल्यानंतर, आज सकाळपासून मेंढरच्या भट्टा दुरियन जंगलात पुन्हा गोळीबार सुरू (firing resume on 15th day of search operation) झाला. याठिकाणी भारतीय सैन्यांकडून मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम सुरू आहे.11 आणि 14 ऑक्टोबर रोजी सुरनकोट आणि मेंढर परिसरात झालेल्या वेगवेगळ्या हल्ल्यात एकूण नऊ लष्करी जवान शहीद झाले होते. यानंतर आता गेल्या पंधरा दिवसांपासून संबंधित ठिकाणी भारतीय जवान शोध मोहीम राबवत आहेत.काश्मीरच्या दौऱ्यादरम्यान गृहमंत्री अमित शहा यांनी व्यासपीठावर गेल्यानंतर सर्वात आधी bullet proof काच हटवण्यास सांगितली. pic.twitter.com/a5OtAuKop2
— News18Lokmat (@News18lokmat) October 25, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amit Shah, BJP, Jammu and kashmir