• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • कोट्यवधींची पावडर! मुंबई विमानतळावर लाखोंचं सोनं जप्त, SMUGGLING ची पद्धत वाचून येईल चक्कर

कोट्यवधींची पावडर! मुंबई विमानतळावर लाखोंचं सोनं जप्त, SMUGGLING ची पद्धत वाचून येईल चक्कर

मुंबई विमानतळावर स्मगलिंगसाठी आणलेलं (2 KG gold in the form of wet dust seized) तब्बल 2 किलो सोनं जप्त करण्यात आलं आहे.

 • Share this:
  मुंबई, 25 ऑक्टोबर : मुंबई विमानतळावर स्मगलिंगसाठी आणलेलं (2 KG gold in the form of wet dust seized) तब्बल 2 किलो सोनं जप्त करण्यात आलं आहे. हे सोनं विमानाच्या सीटखाली ओल्या कचऱ्याच्या (Gold kept under seat) स्वरुपात ठेवण्यात आलं होतं. मुंबईतील कस्टम विभागाला या मोडस ऑपरेंडीची कल्पना आल्यानंतर त्यांनी योग्य पावलं उचलत सोनं जप्त केलं. असं आणलं सोनं अबुधाबीतून मुंबईला आलेल्या इत्तेहाद एअरलाईन्सच्या विमानात तब्बल 2 किलो सोन्याची पेस्ट ठेवण्यात आली होती. विमानाच्या सीटखाली जिथं सेफ्टी जॅकेट्स ठेवलेले असतात, तिथे हे सोनं लपवून ठेवण्यात आलं होतं. एका व्यक्तीच्या पँटला या सोन्याची पेस्ट आतून लावण्यात आली होती. मात्र पोलिसांनी या व्यक्तीला पकडून सोनं जप्त केलं आहे. विमानाच्या स्टाफवर संशय अबुधाबीहून एका प्रवाशाने हे सोनं आणलं होतं आणि विमानाच्या सीटखाली लपवून ठेवलं होतं. विमानाची साफसफाई करण्यासाठी येणाऱ्या स्टाफपैकी कुणीतरी हे सोनं विमानातून बाहेर काढणार होता. आतापर्यंतच्या मोडस ऑपरेंडीनुसार या कटात सहभागी असणारा सफाई कर्मचारी ते सोनं विमानातून बाहेर काढत असे, ती ओली पेस्ट आपल्या ट्राऊझरला लावत असे आणि विमानतळावरून आपली ड्युटी संपवून बाहेर येत असे. कस्टम विभागाला मिळाली कल्पना विमानतळ समन्वयाच्या माध्यमातून अबुधाबीतून पेस्टच्या स्वरुपातील सोनं भारतात येत असल्याची टीप कस्टम विभगाला मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सापळा लावला होता. आपल्या ट्राऊझरच्या आतमध्ये सोन्याची पेस्ट लावून बाहेर पडणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी तपासलं आणि त्याला अटक केली आहे. हे वाचा- चोरीच्या पैशांनी पत्नीचा प्रचार, गावात बांधला रस्ता; पोलिसांनी फोडले बिंग पोलीस तपास सुरू विमानचा स्टाफ आणि विमानतळावरचा स्टाफ या दोन्ही ठिकाणचे कर्मचारी या कटात सहभागी असतील, असा संशय कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांना अहे. मात्र चोरीचा हा पॅटर्न कस्टम विभागानं शोधून काढला आणि तो पकडला. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
  Published by:desk news
  First published: