Home /News /national /

Valentine's Week Special: 'आजचं प्रेम फेसबुकिया...', एकेकाळी खतरनाक डाकू असणाऱ्या 'चंबळ क्वीन' ची LOVE STORY

Valentine's Week Special: 'आजचं प्रेम फेसबुकिया...', एकेकाळी खतरनाक डाकू असणाऱ्या 'चंबळ क्वीन' ची LOVE STORY

एके काळी डाकू आणि बंडखोरांचं आश्रयस्थान असलेल्या चंबळच्या खोऱ्यातही (Chambal Valley) प्रेमकहाणीचा बोलबाला होता. 1970 च्या दशकात चंबळची ओळख भयानक, खुनी डाकूंचं आश्रयस्थान अशी असली तरी चंबळच्या घनदाट जंगलातही प्रेमाच्या कथा लिहिल्या गेल्या.

पुढे वाचा ...
मुंबई, 13 फेब्रुवारी: सध्या सगळीकडे व्हॅलेंटाइन वीकचा (Valentine's Day Week) माहौल आहे. व्हॅलेंटाइन डे हा आपल्या आवडत्या व्यक्तीकडे प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. खरं तर प्रेम ही अशी गोष्ट आहे की ती केव्हा, कुठे आणि कोणावर होईल हे सांगता येत नाही. सध्याच्या काळात प्रेमाची व्याख्या बदलताना दिसत आहे. आजकाल प्रेमात इमानदारी, सच्चेपणा पाहायला मिळतोच असं नाही. सच्च्या प्रेमाच्या अनेक कहाण्या सांगितल्या जात असल्या तरी आता काळ बदलल्यानं प्रेमाचं स्वरूपही बदललं आहे. एके काळी डाकू आणि बंडखोरांचं आश्रयस्थान असलेल्या चंबळच्या खोऱ्यातही (Chambal Valley) प्रेमकहाणीचा बोलबाला होता. 1970 च्या दशकात चंबळची ओळख भयानक, खुनी डाकूंचं आश्रयस्थान अशी असली तरी चंबळच्या घनदाट जंगलातही प्रेमाच्या कथा लिहिल्या गेल्या. चंबळची राणी आणि पूर्वाश्रमीची डाकू सीमा परिहार (Dacoit Seema Parihar) यांची प्रेमकहाणी अशीच काहीशी आहे. 'बिग बॉस' फेम सीमा परिहारच्या जीवनावर एका चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. व्हॅलेंटाइन डे वीकच्या निमित्तानं जाणून घेऊया तिची Love Story! हे वाचा-प्रेमात ना पुरुष राहिला ना स्त्री; विधवा महिलेसाठी तरुणाचं वेडेपण पाहून हादराल! चंबळ क्वीन सीमा परिहारची प्रेमकहाणी अनोखी आहे. पूर्वाश्रमीची डाकू सुंदरी असलेल्या सीमा परिहारचं वयाच्या 10-11 व्या वर्षी अपहरण करून तिला चंबळला आणण्यात आलं होतं. याच सीमानं वयाच्या 15व्या वर्षी आपल्या बंदुकीच्या गोळ्यांनी चंबळच्या घनदाट जंगलात दहशत निर्माण केली होती. सीमा परिहारने व्हॅलेंटाइन डेविषयी काहीशी नाराजी व्यक्त केली. 'कसला व्हॅलेंटाइन डे आणि प्रेम. जेव्हा प्रेमात इमानदारी असते, तेव्हाच या गोष्टी जपता येतात. आजचं प्रेम म्हणजे फेसबुक प्रेम आहे,' अशी प्रतिक्रिया सीमा परिहारने दिली आहे. TV9 हिंदीने याबाबत वृत्त दिले आहे. आजचं प्रेम 'फेसबुकिया' असल्याचं ती म्हणते. सुमारे 18 वर्षं चंबळच्या खोऱ्यात डाकू सीमा परिहारचं वास्तव्य होतं. चंबळच्या भयावह खोऱ्यात प्रेमाचा दु्ष्काळ होता असं नाही. ती प्रेमातही पडली पण हे प्रेम कायम राहू शकलं नाही. 'माझं प्रेम आणि लग्नाबाबत मीडिया आणि समाजात इतक्या गोष्टी प्रसिद्ध झाल्या आहेत, की आता मला त्याकडे लक्ष द्यावंसं वाटत नाही. प्रसारमाध्यमांनी माझ्या प्रेमाबाबत जे काही खोडसाळ वक्तव्य प्रकाशित केलं, त्यात त्यांनी त्यांचा राग काढला, त्या माध्यमांचं मी अभिनंदन करते. चंबळमधल्या लालाराम डाकूच्या टोळीची बदनामी टाळण्यासाठी माझं डाकू निर्भय गुर्जरशी (Nirbhay Gurjar) जबरदस्तीनं लग्न लावून दिलं गेलं. चंबळमधल्या सर्वांत जुन्या लालाराम डाकूच्या टोळीतल्या काही वयोवृद्ध आणि श्रीमंत डाकूंच्या सल्ल्यानुसार हा निर्णय घेण्यात आला,' असं सीमा परिहार सांगते. हे वाचा-प्रियकराला वाचवण्यासाठी नवऱ्यासह सासरच्या मंडळींशी नडली; स्त्रीधन केलं परत चंबळचा डाकू निर्भय सिंह गुर्जर आणि लालाराम या दोन अत्यंत खतरनाक व्यक्तींवर सीमा त्या काळी प्रेम करत होती, अशी चर्चा होती. पण तिने मात्र आयुष्यात फक्त एकाच व्यक्तीवर (लालाराम डाकू) प्रेम करत असल्याचं सांगितलं. 'मी डाकू निर्भय गुर्जरवर प्रेम करत नव्हते. ज्या लालारामने माझं वयाच्या 10-11 व्या वर्षी अपहरण केलं होतं, त्याच्या टोळीत मी दाखल होताच टोळीची बदनामी होऊ लागली. तत्त्वांसाठी लढण्याकरिता उडी घेणाऱ्या चंबळमधल्या बंडखोर गुंडांनी धिंगाणा घालायला सुरुवात केली होती आणि हेच बदनामीचं कारण होतं. चंबळमधले डाकू महिला, मुलींच्या अब्रूशी खेळू लागले होते. त्यामुळे हा बदनामीचा डाग पुसण्यासाठी आणि टोळीविषयीचा आदर कायम राहावा यासाठी चंबळ खोऱ्यातला सर्वांत खतरनाक डाकू निर्भय गुर्जरशी माझ्या इच्छेविरुद्ध मला लग्न करावं लागलं. निर्भय गुर्जरवर माझं प्रेम होतं अशा आणि त्याबाबतच्या आजपर्यंत प्रसिद्ध झालेल्या कहाण्या सर्व खोट्या आहेत,' असं सीमा परिहार सांगते. ती पुढे म्हणाली की, 'आमच्या टोळीचा प्रमुख डाकू लालाराम (Dacoit Lalaram) (ज्याच्यावर मी नंतर प्रेम केलं आणि लग्नही केलं) याने डाकू फक्कड बाबा, महिला डाकू कुसुमा नैन, जयसिंग गुर्जर आणि भुरे पंडित यांच्या सांगण्यावरून माझं लग्न निर्भय गुर्जरशी लावून दिलं. चंबळमधल्या माझ्यापेक्षा तीन वर्षांनी ज्युनिअर असलेल्या निर्भय गुर्जरसोबतचा हा विवाह फार काळ टिकला नाही. तीन वर्षांत मी त्याच्यापासून विभक्त झाले. त्यानंतर आमच्या टोळीचा प्रमुख लालाराम याच्यावर माझं खरं प्रेम जडलं. मी त्याच्याशी लग्न केलं. लालारामशी विवाहबद्ध झाल्यावर आम्हाला एक मुलगा झाला. त्यानं पदवीपर्यंत शिक्षण घेतलं आहे; पण नंतर लालाराम हा प्रेमाच्या बाबतीत अपरिपक्व निघाला. त्यामुळे मी त्याच्यापासूनही विभक्त झाले.' हे वाचा-पती, पत्नी आणि 'ती'; चित्रपटासारखीच आहे विक्रम साराभाई यांची Love Story 'काही दिवसांनी कानपूर पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत लालाराम मारला गेला. लालाराम हा आजकालच्या फेसबुक प्रेमींसारखाच होता. त्याचं फळ त्याला देवानं दिलं. तो प्रेमात प्रामाणिक राहिला असता तर आमचं प्रेम कलंकित झालं नसतं. आमच्या प्रेमावर बोट उचलण्याची कोणाचीही हिंमत झाली नसती,' असं सीमा परिहार यांनी स्पष्ट केलं.
First published:

Tags: Love story, Valentine day, Valentine day plans, Valentine's day, Valentine's week

पुढील बातम्या