भोपाळ, 11 फेब्रुवारी : एका तरुणाने आपल्या प्रेयसीसोबत (Girlfriend) राहण्यासाठी जेंडर चेंज करण्याचा निर्णय घेतला. त्याच्यावर उपचारही सुरू होते. आई-वडिलांनी त्याला समजावलं, त्यानंतर त्याने ट्रीटमेंट मध्येच थांबवावी लागली. यामुळे त्याच्या शरीरात पुरुष आणि स्त्री हे दोन्हीही हॉर्मोन्स आहेत. 32 वर्षीय तरुण घरातील एकुलता एक मुलगा आहे. त्याचे वडील क्लास वन ऑफिसरच्या पदावरुन निवृत्त झाले आहेत. तो दिल्लीतील मल्टीनॅशनल कंपनीत जॉब करतो. आपल्या सोबत काम करणाऱ्या महिलेवर त्याचा जीव जडला. यानंतर त्याने जेंडर चेंज ( gender change for love) करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या टप्प्यात त्याच्या बॉडीत हॉर्मोनल चेंज आले. यानंतर तो मुलींसारखं वागायला लागला. अचानक झालेल्या बदलामुळे कुटुंबासमोरच याचा खुलासा झाला. त्याने भोपाळमध्ये तरुण आणि महिलेचं समुपदेशन केलं. तरुण दिल्ली आणि महिला मूळत: मध्य प्रदेशात राहणारी आहे. तरुणाचे आई-वडील भोपाळमधील वकील सरिता राजानीजवळ पोहोचले. त्यांनी सांगितलं की, दीड महिन्यापूर्वी त्यांना मुलामध्ये बदल जाणवला. तो एकटाच रडत बसत असे. रागावत होता आणि छोट्या छोट्या गोष्टीवरुन चिडत होता. कौन्सिलर वकील सरिकाने त्यांच्या म्हणण्यानुसार तरुण आणि महिलेचं समुपदेशन केलं. सध्या करुणाने जेंडर चेंज करण्याची ट्रीटमेंट मध्येच थांबवली आहे. महिलेने लग्नासाठी दिला होता नकार… समुपदेशनादरम्यान तरुणाने सांगितलं की, त्याच्यासोबत 30 वर्षांची महिला नोकरी करते. दोन वर्षांपूर्वी महिलेच्या पतीचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. तिला एक मुलगीही आहे. सहा महिन्यापूर्वी दोघांची भेट झाली होती. ती एकटी राहत होती. येथूनच त्यांच्या मैत्रीची सुरुवात झाली आणि दोघेही प्रेमात पडले. तरुणाने महिलेसोबत लग्नाची मागणी केली. तर महिलेने नकार दिला. तिने सांगितलं की, तिचा पहिला पती तिच्यावर खूप प्रेम करायचा, तिची खूप काळजी घ्यायचा. त्यामुळे त्याच्याशिवाय मी कोणासोबतही लग्न करू शकत नाही. यानंतर तरुणाने स्त्री होण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरशी संपर्क केला आणि जेंडर चेंज करण्यासाठी पहिल्या टप्प्यात हार्मोनल चेंज करण्याचं औषध घेतलं. गेल्या महिनाभरापासून तो हे औषध घेत होता. यामुळे त्याच्या वागणुकीत बरेच बदल झाले. हे ही वाचा- रस्त्यावरच्या कुत्र्यावर नराधमाकडून बलात्कार, ‘या’ एका चुकीमुळे उघड झाली घटना प्रेयसी म्हणाली..तो वेड्यासारखं प्रेम करतो.. कौन्सिलरने याबाबत महिलेशी बातचीत केली. तिने सांगितलं की, तरुणाचे तिच्यावर वेड्यासारखं प्रेम आहे. तो आपल्या निर्णयावरुन कोणाचंही ऐकायला तयार नाही. तो माझंही ऐकत नाही. मी माझ्या पतीला विसरू शकत नाही, मी दुसऱ्या व्यक्तीला स्वत:च्या पतीच्या रुपात स्वीकारू शकत नाही. कसं होतं जेंडर चेंज… ट्रीटमेंटची सुरुवात हार्मोनल थेरेपीने केली जाते. म्हणजे ज्या हार्मोन्सची आवश्यकता असते, ते औषधं आणि इंजेक्शनच्या माध्यमातून शरीरातून इन्जेक्ट केलं जातं. यानंतर सर्जरी केली जाते. यामध्ये साधारण 5 ते 6 तास लागतात. यादरम्यान ब्रेस्ट, प्रायव्हेट पार्ट आणि चेहऱ्यावर काम केलं जातं. सर्जरी करण्यासाठी किमान वय 20 असणं आवश्यक असतं. ऑपरेशननंतर कमीत कमी 1 वर्षांपर्यंत हार्मोनल थेरेपी कायम ठेवली जाते.
जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.