जाहिरात
मराठी बातम्या / देश / प्रियकराला वाचवण्यासाठी नवऱ्यासह सासरच्या मंडळींशी नडली; सर्वांसमोर स्त्रीधन केलं परत

प्रियकराला वाचवण्यासाठी नवऱ्यासह सासरच्या मंडळींशी नडली; सर्वांसमोर स्त्रीधन केलं परत

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

एखाद्या चित्रपटाप्रमाणे पोलीस ठाण्यात हा सर्व प्रकार घडला.

  • -MIN READ
  • Last Updated :

रायपूर, 12 फेब्रुवारी : छत्तीसगडच्या (Chhattisgarh News) कांकेरमधून पती-पत्नी (Husband and wife) आणि वो सारख्या अनेक चित्रपटाच्या कथा समोर आल्या आहेत. येथे एक प्रेमिका आपल्या पतीपासून प्रियकराला वाचवण्यासाठी त्याची ढाल म्हणून उभी राहते. प्रेयसीची वागणूक पाहून कुटुंबीयांनाही धक्का बसला. शेवटी प्रेयसी जिंकली. आणि ती आपल्या प्रियकरासोबत निघून गेली. हा सर्व प्रकार पोलीस स्टेशनमध्ये झाला. मिळालेल्या माहितीनुसार, दंतेवाडाच्या इथे राहणारी आरती सहारे बस्तरच्या विकास गुप्तावर प्रेम करीत होती. तिला त्याच्यासोबत लग्न करायचं होतं. मात्र कुटुंबीयांनी आरतीचं लग्न महाराष्ट्रातील एका तरुणासोबत ठरविण्यात आलं. 6 फेब्रुवारी रोजी दोघांचं लग्न झालं. दुसऱ्या दिवशी आरती आपल्या पतीसोबत सासरी गेली. यानंतर मात्र कहाणी बदलली आणि प्रियकराची एन्ट्री झाली. सासरी पोहोचण्यापूर्वीच झाली फरार.. ६ फेब्रुवारीला लग्नानंतर आरती तिचा प्रियकर विकाससोबत फरार झाली. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. कांकेर पोलिसांनी 7 फेब्रुवारी रोजी दोघांना पकडून पोलिस ठाण्यात आणले. 8 फेब्रुवारीपर्यंत या प्रकरणातील कौटुंबिक नाटय़ रस्त्यापासून पोलिस ठाण्यापर्यंत सुरूच होते. आरती तिचा प्रियकर विकाससोबत राहण्यावर ठाम होती. अखेर पोलिसांनी तिला नातेवाईकांच्या ताब्यात दिले. दरम्यान, पोलिसांनी प्रियकर विकासलाही सोडून दिले. प्रकरण निकाली निघाल्यानंतर आरती पोलिस स्टेशनच्या बाहेर आली तेव्हा तिला दिसले की, तिच्या पतीच्या कुटुंबीयांनी विकासला घेरले आहे. हे ही वाचा- मोठ्या आवाजात ऐकत होती गाणं; इअरफोनमुळे 21 वर्षीय मोनिकाचा गेला जीव आरतीने विकासला घेरलेलं पाहून ती कुटुंबाच्या समोर आली. तिची वागणूक पाहून पती आणि त्याच्या कुटुंबालाही धक्का बसला. शेवटी तेही मागे हटले. यादरम्यान आरतीने आपलं मंगळसूत्रही पतीला परत दिलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात