• Home
  • »
  • News
  • »
  • national
  • »
  • Uttarakhand Disaster: आतापर्यंत सापडले 26 जणांचे मृतदेह, 171 जण बेपत्ता असल्याची भीती

Uttarakhand Disaster: आतापर्यंत सापडले 26 जणांचे मृतदेह, 171 जण बेपत्ता असल्याची भीती

उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्य़ात हिमनदी फुटून झालेल्या दुर्घटनेत 26 जणांचे मृतदेह सापडले असून अद्याप 171 जण बेपत्ता असल्याची माहिती समोर येते आहे.

  • Share this:
चमोली, 09 फेब्रुवारी: उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्य़ात हिमनदी फुटून झालेल्या दुर्घटनेत (Uttarakhand Disaster) अनेकजण वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या अत्यंत दुर्दैवी घटनेमध्ये 26 जणांचे मृतदेह सापडले असून अद्याप 171 जण बेपत्ता असल्याची माहिती समोर येते आहे.  अनेक संस्था मदतकार्य करीत असून ऊर्जा प्रकल्पाच्या बोगद्यातून तीस कामगारांची सुटका करण्यात आली. मृतांची संख्या आणखी जास्त असण्याची शक्यता आहे. राज्य आपत्कालीन मोहीम केंद्राने सांगितले की, नंदादेवी हिमदीचा भाग जोशीमठ भागात फुटल्याने पाणी वेगाने खाली आले. त्यामुळे अलकनंदा नदीची जलपातळी वाढली होती. अजूनही 171 जण बेपत्ता असून जलविद्युत प्रकल्पाच्या ठिकाणी ते काम करीत होते. दरम्यान याठिकाणी मदतकार्य करताना भारतीय लष्कर, एअरफोर्स नेव्ही, आयटीबीपी (ITBP) आणि एनडीआरएफचे जवान देवदूत ठरत आहेत. प्राणांची बाजी लावत या तुकड्या बचावकार्य करत आहेत. पुरामध्ये अडकलेल्या अनेक लोकांना त्यामुळे वाचवण्यात यश आले आहे. या लोकांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्यात आले असून त्यांनी आवश्यक गोष्टी पुरवण्यात येत आहेत. राज्य आपत्ती निवारण दलाच्या (SDRF) जवानांबरोबरच इंडो-तिबेट पोलीस (ITBP) दलातील जवानही मदतकार्यात सहभागी आहेत. (हे वाचा-इथेही भारताने चीनला पाजलं पाणी! वाचा नेमका काय आहे प्रकार?) याठिकाणी अडकलेल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. धौलीगंगा नदीला महापूर आला असून नंदप्रयाग, कर्णप्रयाग, देवप्रयाग, रुद्रप्रयाग या परिसरातील हॉटेल, लॉज आणि घरं खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहे. जोशीमठपासून रैणी गावापर्यंत लष्कराचे 2 कॉलम अर्थात जवळपास 200 जवान तैनात आहेत. तर 4 कॉलम अर्थात 400 जवान स्टँडबाय पूर्ण तयारीमध्ये आहेत. लष्कराने जोशीमठासाटी एक कंट्रोल रुम देखील स्थापित केले आहे आणि लष्कराचे दोन हेलिकॉप्टर या भागाची वेळोवेळी रेकी करत आहेत आणि अनेकांना एअरलिफ्ट देखील करण्यात येत आहे. (हे वाचा-गोहत्या बंदी विधेयकामुळे मोठा गदारोळ;काँग्रेस नेत्याने परिषदेत बिलाची प्रत फाडली) दरम्यान उत्तराखंड राज्य सरकारकडून  मृतांच्या कुटुंबास 4 लाखांची मदत जाहीर करण्यात आली असल्याची माहिती, मुख्यमंत्री रावत यांनी दिली आहे. तर, केंद्र सरकारकडून दोन लाखाची मदत जाहीर करण्यात आलेली आहे.
Published by:Janhavi Bhatkar
First published: