मराठी बातम्या /बातम्या /देश /इथेही भारताने चीनला पाजलं पाणी! वाचा नेमका काय आहे प्रकार?

इथेही भारताने चीनला पाजलं पाणी! वाचा नेमका काय आहे प्रकार?

एका अहवालातून ही बातमी समोर आली आहे

एका अहवालातून ही बातमी समोर आली आहे

एका अहवालातून ही बातमी समोर आली आहे

नवी दिल्ली, 9 फेब्रुवारी : गेल्या दहा वर्षांपासून भारत पाण्याच्या दुर्भिक्ष्याला (Water Scaricity) तोंड देत आहे. देशातील सुमारे 60 कोटी लोक पाणीटंचाईला तोंड देत असल्याचे 2018 मध्ये निती आयोगाने म्हटलं होते. ही स्थिती असताना दुसरीकडे चीनला (China) मोठ्या प्रमाणावर पाणी विक्री (Water Export) करण्यात येत आहे. 2020 मध्ये चीन हा भारताकडून मोठ्या प्रमाणात मिनरल (Miniral Water) आणि नैसर्गिक पाणी (Natural Water) खरेदी करणारा प्रथम क्रमांकाचा देश ठरला आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांक हा मालदिवचा (Maldive) लागतो.

पाणी निर्यातीतून नेमके काय गवसले?

भारतातून किती पाणी कोणत्या देशांना निर्यात केले जाते, याचा तपशील लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान स्पष्ट झाला. प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री हरदिप पुरी यांनी सांगितले,की 2015-16 ते 2020-21 (एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत) दरम्यान भारताने एकूण 38,50, 431 लीटर पाणी निर्यात केले आहे. या आकडेवारीबाबत डाऊन टू अर्थ या नियतकालिकात सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

ही आहे आकडेवारी

निर्यात झालेल्या पाण्यात मिनरल आणि नॅच्युरल वाॅटर अशा दोन्ही प्रकारचा समावेश आहे. या 5 वर्षांत भारतातून सुमारे 23,78,227 लीटर मिनरल तर 8,69,815 नॅच्युरल वाॅटर निर्यात झाले आहे. यात चीन हा सर्वात मोठा खरेदीदार राहिला आहे. चीनला अनेक प्रकारचे पाणी निर्यात करण्यात आले असून, केवळ मिनरल वाटरच्या माध्यमातून भारताला सुमारे 31 लाख रुपये मिळाले आहे. तसेच मालदिव, सौदी अरब आणि संयुक्त अरब अमिराती या देशांना देखील विविध प्रकारचे पाणी निर्यात करण्यात आले आहे.

कोरोना काळात देखील झाली पाणी निर्यात

भारतातील पाणी उद्योग हा फार मोठा असल्याचे 2020-21 मधील डेटावरुन स्पष्ट होते. कोरोना महामारीच्या (Corona Pandemic) कालावधीत बहुतांश देशांनी प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्या सीमा बंद केल्या होत्या, मात्र अशा स्थितीतही काही महिन्यांच्या कालावधीत भारताने विविध देशांना सुमारे 155.86 लाख रुपयांचे पाणी विक्री केली आहे.

व्हर्च्युअल पाणी निर्यात

वरील आकडेवारीवरुन थेट पाणी विक्रीची स्थिती स्पष्ट होते. मात्र या व्यतिरिक्त अजून एक अशी गोष्ट आहे की जी आश्चर्यकारक म्हणता येईल. ती म्हणजे भारत व्हर्च्युअल पाणी निर्यातीत (Virtual Water Export) अग्रस्थानी आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की व्हर्च्युअल पाणी निर्यात म्हणजे काय?  तर व्हर्च्युअल पाणी निर्यातीचा थेट संबंध हा त्या पिकांशी आहे ज्यांचे उत्पादन अधिक पाण्यावर होते. जास्त पाणी लागणाऱ्या पिकांची विक्री भारत दुसऱ्या देशांना करतो, ही एक प्रकारे व्हर्च्युअल पाणी निर्यात होय. यामध्ये खरेदीदार देश आपल्याकडे उपलब्ध पाणी वाचवतात आणि कमी पाण्यावरील पिके घेऊन भूजलाचा योग्य वापर करतात.

जास्त पाणी लागणाऱ्या पिकांची विक्री

ही बाब अधिक सोप्या पध्दतीने समजून घेऊ. एक कप भात शिजवण्यासाठी किती पाणी लागते तर जवळपास तेवढेच किंवा कमी. परंतु, एक तांदूळ उत्पादनासाठी किती पाणी लागते, याची कल्पना न केलेलीच बरी. एक किलो तांदूळ उत्पादनासाठी जवळपास 2173 लीटर पाणी खर्च होते. जेव्हा भारत या तांदळाची निर्यात करतो तेव्हा त्याच बरोबर व्हर्च्युअली पाणी देखील निर्यात होते. यामुळे केवळ अन्न निर्यातच नाही तर मोठ्या प्रमाणावर पाणी देखील निर्यात होत आहे.

तांदळाच्या माध्यमातून पाण्याची निर्यात

2014-15 मध्ये देशातून 37.2 लाख टन बासमती तांदूळ (Basmati Rice) दुसऱ्या देशांना विक्री करण्यात आला. यासाठी सुमारे 10 लाख ट्रिलियन लीटर पाणी वापरले गेले. हे पाणी प्रत्यक्षात दिसत नसले तर ते अन्य देशांना निशुल्क निर्यात झाले असे म्हणावे लागेल.

निती आयोगाच्या समग्र जल प्रबंधन सूचकांकाने प्रसिध्द केलेल्या अहवालानुसार, देशातील सुमारे 60 कोटी नागरिक गंभीर पाणीटंचाईचा सामना करीत आहेत, त्यामुळे ही स्थिती आणि पाणी निर्यातीची आकडेवारी बघता यावर चर्चा होणे आवश्यक आहे.

पिण्याच्या पाण्याचे गहिरे संकट

2018 मधील अहवालानुसार, अशुध्द पाण्यामुळे दरवर्षी सुमारे दोन लाख लोक मृत्यूमुखी पडतात. सध्याच्या कोरोना काळातही ही स्थिती नक्कीच सुधारलेली नसून या आकडेवारीत वाढ झाली आहे. 2030 पर्यंत ही स्थिती अधिकच बिघडणार असून त्याचा थेट परिणाम देशाच्या जीडीपीवर (GDP) होणार असल्याचे अहवालात म्हटलं आहे.

हे देखील वाचा -  गोहत्या बंदी विधेयकामुळे मोठा गदारोळ; काँग्रेस नेत्याने विधान परिषदेत बिलाची प्रतचं फाडली

देशातील अनेक नागरिकांना पिण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध होत नसताना देखील भूजलाची (Ground Water मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. यामुळे स्थिती आणखीनच बिघडणार आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने 2019मध्ये जलजीवन अभियान सुरु केले आहे. या अंतर्गत 2024 पर्यंत ग्रामीण भागातील जनतेला शुध्द पाणीपुरवठा करण्याचे उदिदष्ट ठेवण्यात आले आहे. या अभियानाची अंमलबजावणी सुरु झाली असली तरी त्याची फलनिष्पत्ती स्पष्ट होणे बाकी आहे.

First published:

Tags: China, Corona, Drink water, India, India china