मराठी बातम्या /बातम्या /देश /गोहत्या बंदी विधेयकामुळे मोठा गदारोळ; काँग्रेस नेत्याने विधान परिषदेत बिलाची प्रतचं फाडली

गोहत्या बंदी विधेयकामुळे मोठा गदारोळ; काँग्रेस नेत्याने विधान परिषदेत बिलाची प्रतचं फाडली

सुरुवातीपासूनच  गोहत्या बंदी विधेयकाचा विरोध केला जात आहे. आजही तोच प्रकार पाहायला मिळाला

सुरुवातीपासूनच गोहत्या बंदी विधेयकाचा विरोध केला जात आहे. आजही तोच प्रकार पाहायला मिळाला

सुरुवातीपासूनच गोहत्या बंदी विधेयकाचा विरोध केला जात आहे. आजही तोच प्रकार पाहायला मिळाला

कर्नाटक, 8 फेब्रुवारी : कर्नाटक सरकारने गेल्या महिन्यात गोहत्या बंदी विधेयकाची घोषणा केली होती. तेव्हापासून या विधेयकावर काँग्रेसकडून विरोध केला जात आहे. त्यात आज तर काँग्रेस नेत्याने या परिषदेमध्ये सर्वांसमोर विधेयकाची प्रत फाडली. यामुळे हे प्रकरण अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  यापूर्वी  विधानसभेत हे विधेयक मंजूर झालं होतं. मात्र भाजपकडे पुरेसा पाठिंबा नसल्यानं विधान परिषदेत मंजूर होऊ शकलं नव्हतं. यानंतर भाजपने JDS कडे बिल पास करण्यासाठी पाठिंबा देण्याचं आवाहन केलं. त्यानंतर आज विधान परिषदेत कर्नाटक मंत्री प्रभू चौहान यांनी गोहत्या बंदी विधेयक सादर केलं. आणि विधेयकाला मंजुरी मिळाली आहे. यावेळी व्हॉइस वोटच्या माध्यमातून विधेयक मंजूर करण्यात आलं आहे.

यानंतर विधान परिषदेत मोठा गदरोळ झाला. काँग्रेस नेत्यांनी या बिलाचा कडाडून विरोध केला. या विधेयकात पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या प्रमाणपत्रासह गायींची कत्तल करण्यास कडक शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. यावर काँग्रेस नेत्यांनी संताप व्यक्त केला. बिलाच्या मंजुरीनंतर काँग्रेस नेत्याने बिलाची प्रत फाडून टाकली.

हे ही वाचा-सलग 5 तासांहून अधिक वेळ काम करता? 1 एप्रिलपासून मोदी सरकार नियमांमध्ये करणार बदल

कर्नाटक सरकारने गेल्या महिन्यात गोहत्या बंदी विधेयकाची घोषणा केली होती. या बिलामध्ये गायींची हत्या केल्यास दंड केला जाऊ शकतो. याशिवाय गायींना वाचविणाऱ्यांच्या सुरक्षेची सोयही करण्यात आली आहे. या विधेयकाला आता विधान परिषदेतही (Voice vote) मंजुरी मिळाली आहे.

गोहत्येवर 3-7 वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद

बिलाअंतर्गत गायींच्या हत्यासाठी 3 ते 7 वर्षांपर्यंत कैद आणि 50000 रुपयांपासून 5 लाखांपर्यंत दंड आकाराला जाऊ शकतो. आणि त्यानंतर होणाऱ्या गुन्ह्यात 7 वर्षांपर्यंत कैद आणि 1 लाख रुपयांपासून ते 10 लाखांपर्यंतचा दंड होऊ शकतो. या बिलामध्ये सर्व वयाच्या प्राणी ज्यात गाय, गाईचं वासरू, बैल आणि सर्व वयाच्या बैलांच्या हत्येसाठी शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

First published: