मुंबई, 18 मार्च: उत्तराखंडच्या मुख्यमंत्री पदी विराजमान होताच तिरथ सिंह रावत (Tirath Singh Rawat) यांनी वादग्रस्त विधान केले आहे. महिलांनी परिधान करण्याच्या जीन्सबाबत (Tirath Singh Rawat comment on Ripped Jeans) त्यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे. यानंतर देशभरातील महिला नेत्यांनी त्यांच्या वक्तव्याचा कडाडून विरोध केला आहे. अनेकांनी सोशल मीडियावरून त्यांना खडे बोल सुनावले आहेत. मंगळवारी बाल अधिकार संरक्षण आयोगच्या एका कार्यशाळेचं उद्घाटन करताना मुख्यमंत्र्यांनी हे विधान केलं. महिलांच्या कपड्यांविषयी केलेलं हे वक्तव्य (Uttarakhand CM on Jeans) चांगलच चर्चेत आलं आणि अनेकांनी याबाबत संताप व्यक्त केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, महिलांनी फाटलेली जीन्स घालणं म्हणजे संस्कार नाही. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा (Mahua Moitra) आणि शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. चतुर्वेदी यांनी तर रिप्ड जिन्समधील फोटो पोस्ट करत उपहासात्मक टिका केली आहे. महुआ मोइत्रांनी असं ट्वीट केलं आहे की, ‘उत्तराखंडचे मुख्यमंत्री: खाली पाहिलं तेव्हा गमबुट होते.. आणि वर पाहिलं तर… एनजीओ चालवता आणि कपडे गुडघे फाटलेले घालता? CM साहेब तुम्हाला जेव्हा पाहिलं तेव्हा वर, खाली, पुढे, मागे सगळीकडे आम्हाला केवळ एक निर्लज्ज माणूस दिसला. एका राज्य चालवता पण मेंदू फाटका आहे तुमचा,’
Uttarakhand CM :
— Mahua Moitra (@MahuaMoitra) March 17, 2021
“Jabh nichey dekha toh gumboot the.. aur upar dekha toh .... NGO chalati ho aur ghutney phatey dikte hai?”
CM saab- jabh apko dekha toh upar neeche aagey peechey humein sirf besharm behuda aadmi dikhta hai
State chalatey ho aur dimaag phatey dikte hai?
महुआ मोईत्रांपाठोपाठ शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी देखील मुख्यमंत्री रावत यांना लक्ष्य केलं आहे. त्यांनी स्वत:चा रिप्ड जीन्स परिधान केलेला एक फोटो पोस्ट केला आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की, ‘देशातील संस्कृती आणि संस्कारांना अशा पुरुषांमुळे धोका आहे जे महिला आणि त्यांनी निवडलेल्या गोष्टींवरून मत तयार करतात. मुख्यमंत्री रावतजी तुम्ही तुमचे विचार बदला म्हणजे देश बदलेल’.
काय म्हणाले होते रावत? फाटक्या जीन्सच्या वापरावरून तीरथ सिंह रावत यांनी महिलांच्या संस्कारांबाबत भाष्य केले होते. त्यांनी यावेळी एक अनुभव सांगितला होता. ते असं म्हणाले की, ‘मी एकदा विमानप्रवासात होतो. त्यावेळी एक महिला आपल्या दोन मुलांना घेऊन बसली होती. त्या महिलेनं फाटलेली जीन्स घातलेली होती. यावेळी मी त्यांना विचारलं की कुठे जायचं आहे.? यावेळी महिलेने दिल्लीला जात असल्याचं म्हटलं. तिने अशी देखील माहिती दिली की, तिचे पती जेएनयूमध्ये प्राध्यापक आहे आणि महिला स्वयंसेवी संस्था चालवते’. (हे वाचा- उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांना अमिताभच्या नातीचं उत्तर, ‘कपडे बदलण्याआधी…’ ) यावर रावत यांनी केलेलं वक्तव्य वादग्रस्त ठरलं. ते पुढे असं म्हणाले की, ‘माझ्या मनात विचार आला, जी महिला NGO चालवते आणि फाटलेली जीन्स घालते, ती समाजात कोणत्या संस्कृतीचा प्रसार करत असेल लागेल.’ त्यांनी पुढे असं देखील म्हटलं की पाश्चिमात्य संस्कृतीपासून दूर राहावं लागेल. रावत यांच्या वक्तव्यानंतर देशभरातून पडसाद उमटत आहेत.