Home /News /entertainment /

उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांना अमिताभच्या नातीचं सडेतोड उत्तर, 'कपडे बदलण्याआधी...'

उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांना अमिताभच्या नातीचं सडेतोड उत्तर, 'कपडे बदलण्याआधी...'

मुख्यमंत्र्यांनी आपल्या विधानात म्हटलं होतं, आजकाल महिला फाटलेली जिन्स (Uttarakhand CM on Jeans) घालून फिरताना दिसतात. हे सगळं बरोबर आहे का? हे संस्कार आहेत का?

    मुंबई 18 मार्च : उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री तिरथसिंह रावत यांनी सत्ता हातात येताच पहिलं वादग्रस्त विधान केलं आहे. मंगळवारी बाल अधिकार संरक्षण आयोगच्या एका कार्यशाळेचं उद्घाटन करताना मुख्यमंत्र्यांनी हे विधान केलं. महिलांच्या कपड्यांविषयी केलेलं हे वक्तव्य (Uttarakhand CM on Jeans) चांगलच चर्चेत आलं आणि अनेकांनी याबाबत संताप व्यक्त केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, महिलांनी फाटलेली जिन्स घालणं म्हणजे संस्कार नाही. उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य - मुख्यमंत्र्यांनी आपल्या विधानात म्हटलं होतं, आजकाल महिला फाटलेली जिन्स घालून फिरताना दिसतात. हे सगळं बरोबर आहे का? हे संस्कार आहेत का? लहानांना लागणारे संस्कार हे मोठ्यांकडून येत असतात. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या विधानामुळं सोशल मीडियावरही त्यांना चांगलंच ट्रोल व्हावं लागलं. यानंतर आता अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली हिनंदेखील रावत (Navya Naveli on Ravat's Statement) यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. तिनं मुख्यमंत्र्यांनाच आपली मानसिकता बदलण्याचा सल्ला दिला आहे. नव्यानं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत म्हटलं, की आमचे कपडे बदलण्याआधी स्वतःची मानसिकता बदला. यात ही गोष्ट हैराण करणारी आहे, की समाजात कशाप्रकारचा संदेश दिला जात आहे. या विधानामुळे नव्याला आपला राग इतका अनावर झाला की तिनं गुडघ्यावर फाटलेल्या जीन्समधील आपला फोटोदेखील पोस्ट केला. तो फोटो शेअर करत नव्यानं लिहिलं, मी माझी फाटलेली जीन्स घालेल. खूप गर्वानं घालेल. धन्यवाद. अमिताभ यांच्या नातीची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. नव्याला अनेकांनी दिलं समर्थन - मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याविरोधात आवाज उठवणाऱ्या नव्याला आता अनेकांनी पाठिंबा दिला आहे. सर्वच या विधानाची निंदा करत असून महिलांबद्दलचा हा विचार निंदनीय असल्याचं म्हणतं आहेत. ही पहिली वेळ नाही, की अमिताभ यांच्या नातीनं एखाद्या गोष्टीविरोधात आवाज उठवला. याआधीही तिनं अनेक मुद्द्यांवर आपलं मत मांडलं आहे. सोशल मीडियावर ती केवळ आपले फोटो शेअर करण्यात सक्रीय नाही. तर, अनेकदा या माध्यमातून ती आपले विचारही मांडत असते.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Navya naveli, The controversial statement, Uttarakhand

    पुढील बातम्या