जाहिरात
मराठी बातम्या / देश / 'सरकारच्या या चुकीमुळे चेतन चौहानांचा मृत्यू झाला', शिवसेननं आरोप करत केली CBI चौकशीची मागणी

'सरकारच्या या चुकीमुळे चेतन चौहानांचा मृत्यू झाला', शिवसेननं आरोप करत केली CBI चौकशीची मागणी

'सरकारच्या या चुकीमुळे चेतन चौहानांचा मृत्यू झाला', शिवसेननं आरोप करत केली CBI चौकशीची मागणी

माजी कॅबिनेट मंत्री चेतन चौहान (Minister Chetan Chauhan) यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी उत्तर प्रदेश शिवसेनेने (Shiv Sena) सोमवारी केली.

  • -MIN READ
  • Last Updated :

लखनऊ, 25 ऑगस्ट : माजी कॅबिनेट मंत्री चेतन चौहान (Minister Chetan Chauhan) यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी उत्तर प्रदेश शिवसेनेने (Shiv Sena) सोमवारी केली. यासंदर्भात पक्षनेत्यांच्या शिष्टमंडळाने सोमवारी राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची भेट घेऊन यासंदर्भात निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, कोणत्या परिस्थितीत संजय गांधी इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, लखनऊ येथून चेतन चौहान यांना गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात पाठवले गेले. SGPGI सारख्या नामांकित संस्थेवर सरकारचा विश्वास नाही का? निवेदनात म्हटले आहे की सरकार झोपलेला राहिला आणि राज्यातील दोन मंत्र्यांचा मृत्यू झाला. सरकारने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी. वाचा- सुशांतवर Black Magic? आत बाबा-बुवाही येणार CBI चौकशीच्या फेऱ्यात 16 ऑगस्ट रोजी झाला चेतन चौहन यांचा मृत्यू उत्तर प्रदेशच्या योगी सरकारचे कॅबिनेट मंत्री चेतन चौहान यांचे 16 ऑगस्ट रोजी निधन झाले. गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. चौहान यांची तब्येत अचानक बिघडली होती, त्यानंतर त्यांना लखनऊच्या पीजीआय मधून गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले. एका महिन्यापासून ते कोरोनाची लढा देत होते. चौहान यांना सुमारे 36 तास व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. भारताकडून 40 कसोटी सामने खेळणारे चौहान 73 वर्षांचे होते, त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा विनायक आहे. वाचा- अंडरवर्ल्डने केली सुशांतची हत्या, RAWच्या माजी अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा 12 जुलै झाली होती कोरोनाची लागण महत्त्वाचे म्हणजे चेतन चौहान यांना 12 जुलै रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर लखनऊच्या संजय गांधी पीजीआय रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र त्यांची प्रकृती अधिकच खराब झाली आणि त्यानंतर त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात हलविण्यात आले. तेथेच उपाचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: shivsena
  • First Published :
जाहिरात
जाहिरात