नवी दिल्ली 24 ऑगस्ट: अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणी आता अनेक दावे करण्यात येत आहेत. या दाव्यांमुळे खळबळ उडाली आहे. सध्या या प्रकरणाची सीबीआय चौकशी करत आहे. सीबीआयसमोर अनेक गोष्टी येत असल्याने या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणारी भारताची गुप्तचर संस्था RAWचे माजी अधिकारी एन.के. सूद यांनी हा दावा केला आहे. ‘टाईम्स नाऊ’वर बोलतांना त्यांनी हा दावा केलाय. सूद म्हणाले, ही हत्या अंडरवर्ल्डने केली असावी. त्यांनी अतिशय सुनियोजित पद्धतीने हे काम केलं असावं. त्यांनी यासाठी सुशांतच्या घरात काम करणाऱ्या नोकरांचाही वापर केला असावी अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली. सुशांतच्या खात्यातून अनेक खात्यांमध्ये पैसे वळविण्यात आले होते. पोलिसांचं लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी हे काम केलं गेलं असावं असंही ते म्हणाले. मुंबईत अंडरवर्ल्डची अजुनही दहशत आहे असंही सूद यांनी सांगितलं. SSR Case: समोर आलं इंग्लंड संघाचं कनेक्शन, रियावर गोलंदाजाचं ट्वीट व्हायरल रविवारी पुन्हा एकदा CBIची टीम सुशांतच्या घरी पोहोचली होती. त्यावेळी त्यांच्यासोबत तीन खास माणसं होती. यात सुशांतचा कुक नीरज, हाऊस मॅनेजर दीपेश सावंत आणि त्याचा रुम पार्टनर सिद्धार्थ पिठानी यांचा समावेश आहे. सीबीआय 13 आणि 14 जूनला नेमकं सुशांतच्या घरात काय घडलं याची माहिती घेत आहे. त्यातिघांचीही नंतर सीबीआयने चौकशीही केली होती. …म्हणून सुशांतला नैराश्य आलं होतं, आता चेतन भगत यांनी सांगितलं वेगळंच कारण हे तिघेही जण 14 जूनला सुशांतसोबतच होते. त्यामुळे त्यांच्याकडून सीबीआयला महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे. सुशांतची आत्महत्या नसून त्याची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त होतोय. त्यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असल्याने सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने त्याला परवानगी दिली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.