मुंबई 24 ऑगस्ट: देशातील सर्वात मोठी तपास यंत्रणा असलेली सीबीआय सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करत आहे. या तपासाने वेग घेतला असून आता Black Magic संदर्भात होणाऱ्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याची शक्यता आहे. सुशांत सिंग राजपूतवर सतत काळी जादू केली जात होती. या करता काही खास ठिकाणी सुशांत सिंग राजपूतवर अध्यात्मिक उपचार देखील केले जात होते. हे उपचार कोणाच्या सांगण्यावरून आणि कशा करता केले जात होते याचा तपास आता सीबीआय करणार आहे. या BLACK MAGIC INVESTIGATIONसाठी काही बाबा-बुवांना देखील सीबीआय चौकशीसाठी बोलावू शकते. सुशांतच्या परीवारानेही सुशांतवर काळी जादू केली जात होती असा आरोप केला होता.
सुशांत सिंग राजपूत बांद्रा पाली हिल येथील या पर्ल हाईटस इमारती रहायचा तेव्हा त्याला घरातून विचित्र आवाज येत होते. त्याच्या या घरात भूत आहे जे सुशांतला त्रास देत होतं अशी माहिती बाहेर आली होती. त्यामुळेच सुशांतने 2019मध्ये हे घर सोडलं आणि बांद्रा कार्टर रोड येथील माऊंट ब्लॅंक या इमारतीत तो ड्युपलेक्स फ्लॅट भाड्याने घेवून राहू लागला होता. रियाच्या सांगण्यावरूनच त्याने ते घर सोडल्याची माहिती आहे.
सुशांतने कार्टर रोड येथे घेतलेल्या नव्या घराचे सर्व व्यवहार रियानेच केले होते. एवढच नाही तर या भूत प्रेतांपासून सुटका मिळावी म्हणुन रियाने सुशांतवर काळ्या जादूचा प्रयोग देखील केला होता अशी माहितीही बाहेर आली आहे. शिवाय अध्यात्मिक उपचाराकरता रिया आपल्या परीवारासोबत सुशांतला घेऊन दोन महिने कुठे तरी राहिली होती असा आरोप सुशांतच्या परिवाराकडून रियावर करण्यात आला होता. यामुळेच सीबीआय आता सुशांत सिंग राजपूत प्रकरणात याा आरोपांची चौकशी करणार आहे.
अंडरवर्ल्डने केली सुशांतची हत्या, RAWच्या माजी अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा
रिया सुशांत आणि तिच्या परीवारासोबत वाॅटर स्टोन क्लब मध्ये राहत होती. तिथेच सुशांतवर ठाण्यातील मोहन जोशी नामक अध्यात्मिक उपचार कर्त्याकडून दोन वेळा अध्यात्मिक उपचार केले गेले होते. त्यासाठी रियानेच पुढाकार घेतला होता असंही सांगितलं जात आहे.
इंटरनेटवरुन रियाने मोहन जोशी यांच्याबाबत माहिती मिळवली होती आणि रियानेच मोहन जोशी यांना फोनही केला होता. अंधेरीतील वाॅटर स्टोन क्लब हा महागडा क्लब असून, सुशांत इथला VIP मेंबर होता. रिया त्याच्या आयुष्यात येण्या आधी पासूनच सुशांत या क्लब मध्ये जात होता. त्यानंतर रिया देखील सुशांत सोबत या क्लब मध्ये येवू लागली होती.
सुशांत आणि रिया युरोप दौऱ्यावरुन आल्यानंतर याच वाॅटर स्टोन क्लब मध्ये 2 महिने राहिले होते. येथेच रियाने अध्यात्मिक उपचारकर्ते मोहन जोशी यांना बोलावून त्यांच्याकडून सुशांतवर उपचार केले होते. सीबीआयने दोन वेळा या वाॅटर स्टोन क्लबवरची पाहणी केली आहे.
सुशांत इथे किती दिवस राहत होता? त्याने पैसे ॲानलाईन, चेकद्वारे कि रोख भरले? त्याच्या सोबत कोण कोण राहत होते? रियाने इथे कोणाला बोलावले होते? याची माहिती आता घेतली जात आहे.
दिशा सॅलिअन आत्महत्या प्रकरणाला नवे वळण, धक्कादायक माहितीने खळबळ
सीबीआयने वाॅटर स्टोन क्लब मधून महत्वाची कागदपत्रे जप्त केली आहे. फक्त काळी जादू या आरोपावरच नाही तर काही लोकांनी सुशांतवर नियंत्रण मिळवलं होतं असा आरोपही त्याच्या कुटुंबीयांनी केला होता.
सुशांत सिंह राजपूतच्या परीवारावाराने केलेल्या प्रत्येक आरोपीची आम्ही शाहनिशा करणार आहोत असं सीबीआयच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात सीबीआय सुशांत प्रकरणातील बाबा बुवांना देखील चौकशीसाठी बोलणविणार आहे.