बाराबंकी, 07 जून : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊला (Lucknow) लागूनच असलेल्या बाराबंकीमध्ये (Barabanki) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पैशाच्या (Money) आमिषापोटी एका सासऱ्यानं सुनेला 80 हजार रुपयांमध्ये विकल्याचा (Father in law sell daughter in law for 80k)हा प्रकार आहे. याबाबत मुलाला समजताच त्यानं पित्याविरोधात तक्रार दाखल केली, त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत महिलेची सुटका केली.
(वाचा-VIDEO: इंजेक्शन नाही, नाकावाटे घेण्यात येणार आता कोरोनाची लस; ट्रायल सुरू)
बाराबंकीमध्ये रामनगर तालुक्यातील मल्लापूर गावची ही घटना आहे. याठिकाणी राहणाऱ्या चंद्रराम वर्मा यांचा मुलगा प्रिन्सचा विवाह 2019 मध्ये आसाममध्ये राहणाऱ्या मुलीबरोबर झाला होता. प्रिन्सनं लव्ह मॅरेज केलं होतं. एका अॅपच्या माध्यमातून दोघं ऑनलाईन भेटले होते. त्यानंतर त्यांनी लग्न केलं होतं. लग्नानंतर दोघंही अत्यंत आनंदात वैवाहीक जीवन जगत होते. प्रिन्स हा त्याच्या पत्नीसह गाझियाबादला राहण्यासाठी गेला होता. त्याठिकाणी तो टॅक्सी चालवायचं काम करत होता.
(वाचा-लिपिकपदाच्या नियुक्तीसाठी एकाची आत्महत्या; पुण्यात 40 उमेदवारांचे साखळी उपोषण)
इकते प्रिन्सचे वडील चंद्रराम यांच्या मनात भलताच कट शिजत होता. त्यांनी प्रिन्सची पत्नी म्हणजे स्वतःच्या सुनेला 80 हजार रुपयांमध्ये विकण्याचा व्यवहार केला होता. पैशाच्या आमिषापोटी थेट सुनेलाच त्यांनी विकलं होतं. सुनेला त्यांनी 4 जूनला घरी बोलावलं आणि कारस्थान रचलं. रामू गौतमने गुजरातचा तरुण साहील आणि त्याच्या नातेवाईकांना बाराबंकीला बोलावलं आणि संपूर्ण व्यवहार ठरला. सुनेला सासऱ्यानं असं सांगितलं की आरोपी तिला, गाझियाबादला पतीकडं नेऊन सोडतील. खोटं सांगत त्यानं सुनेला त्यांच्यासोबत पाठवलं.
दरम्यान प्रिन्सला त्याच्या मेहुण्याकडून याबाबत माहिती मिळाली. तो पाच तारखेला घरी आला तर पत्नी नव्हती. तसंच पित्याचीही काही खबरबात नव्हती. त्यानंतर त्यानं वडिलांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी लगेचच तपासाची चक्र फिरवली आणि रेलवे स्टेशन बाहेर महिलाला ताब्यात घेत महिलेशी लग्न करण्यासाठी आलेल्या तरुणासह आठ जणांना अटक केली. पोलिसांच्या मते हा प्रकार मानवी तस्करीचा असून, आरोपींचा शोध सध्या घेतला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, UP, Uttar pradesh news