नवी दिल्ली, 7 जून: कोरोनाच्या (Coronavirus) परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी 21 जूनपासून मोफत लसीकरणाला प्रारंभ होणार असल्याची मोठी घोषणा केली. तसंच नाकावाटे घेण्यात येणाऱ्या एका नवीन लसीचं ट्रायल सुरु झाल्याची माहिती मोदींनी (PM Modi) दिली.
21 जूनपासून सर्व 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना मोफत लस (Free corona vaccine for all) देण्याची जबाबदारी केंद्राची असेल, हे त्यांनी स्पष्ट केलं. राज्यांकडे त्यांचा कोटा दिला जाईल, अशी मोठी घोषणा मोदींनी केली.
पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून नोव्हेंबरपर्यंत मोफत धान्य मिळणार- PM
देशात सध्या 7 कंपन्या वेगवेगळ्या लसी तयार करत आहे. दुसऱ्या देशातल्या कंपन्यांनाही लस खरेदीसाठी संपर्क करण्यात आला आहे. लहान मुलांच्या लसीकरणासाठी दोन कंपन्यांच्या ट्रायल्स सुरू आहेत", अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. Nasal Vaccine म्हणजे नाकावाटे देण्यात येणाऱ्या लशीची चाचणीसुद्धा सुरू आहे. ही लस येईल तेव्हा लसीकरणात क्रांती होईल, असं ते म्हणाले.
केंद्राच्या लसीकरणावर टीका माध्यमांतून झाली, त्याचा उल्लेख मोदींनी केला. "ज्येष्ठ नागरिकांचं लसीकरण आधी का केलं, राज्यांना का अधिकार दिले गेले नाहीत याबाबत केंद्र सरकारला विचारलं गेलं. काहींंनी त्याबद्दल टीकाही केली. राज्य सरकारला आपापल्या पातळीवर प्रयत्न करत असतील तर केंद्राला काहीच अडचण नाही. म्हणून 1 मेपासून आम्ही ते काम राज्यांना दिलं. साऱ्या जगात लशींची परिस्थिती काय आहे हे राज्यांच्याही लक्षात आलं. मेमध्ये दुसरी लाट घातक होत असतानाच लसीकरणात गडबड उडाली. अनेक राज्यांना त्याचा अनुभव आला. आता मात्र मोफत लसीकरणाचं काम केंद्र आपल्या हाती घेत आहे."
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.