उत्तर प्रदेश, 20 मे: 'राग हा माणसाचा शत्रू आहे', अशी शिकवण आपल्याला शाळेत असताना मिळाली आहे. रागात (Anger) असलेली व्यक्ती कुठल्याही गोष्टीवर सर्वसमावेशक विचार करू शकत नाही. त्यामुळे रागाच्याभरात तिच्याकडून चुकीचे निर्णय (Wrong Decision) घेतले जाण्याची शक्यता सर्वांत जास्त असते. काहीवेळा तर रागाच्याभरात त्या व्यक्तीच्या हातून एखादा गुन्हा देखील घडून जातो. उत्तर प्रदेशातील (UP) एका ज्येष्ठाच्याबाबतीत असंच काहीसं घडलं. या व्यक्तीनं आपल्याच मुलाचा आणि सुनेचा खून (Father Killed Son and Daughter-in-law) केला. दीप तिवारी असं या ज्येष्ठाचं नाव असून, तो बजरिया पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहतो. तिवारीनं गुरुवारी (19 मे 22) पहाटेच्या सुमारास राहत्याघरी मुलगा आणि सुनेचा गळा चिरून खून केला होता. कानपूर पोलिसांनी (Kanpur Police) अवघ्या काही तासांत या दुहेरी हत्याकांडाचा (Double Murder) छडा लावला आहे. झी न्यूजनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
गुरुवारी सकाळी बजारिया पोलीस स्टेशनच्या हद्दीतील 'रामबाग' घरामध्ये पती-पत्नीचे रक्ताने माखलेले मृतदेह आढळले होते. दोघांचाही धारदार शस्त्राने गळा चिरून खून करण्यात आला होता. मृत व्यक्ती शिवम हा चाटची गाडी लावत असे. शिवमने वर्षाभरापूर्वी जुली नावाच्या मुलीशी प्रेमविवाह केला होता. पोलिसांना खून झाल्याची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहचले. घराला एकच मुख्य गेट असल्याचं पोलीस तपासात (Police Investigation) समोर आलं. घरामध्ये जाण्यासाठी किंवा बाहेर पडण्यासाठी दुसरा कोणताही मार्ग नव्हता. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर या घटनेत घरातील सदस्याचा (Family Member) हात असल्याचा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी घरात उपस्थित असलेल्या सर्व लोकांची बेंझिडीन चाचणी (Benzidine Test) केली. या चाचणीमध्ये मृत शिवमचे वडील दीप तिवारीच्या हातावर रक्त असल्याची खात्री झाली.
पुरामुळे 'या' राज्यात विध्वंस, 27 जिल्ह्यांमध्ये 7 लाखांहून अधिक लोक प्रभावित
त्यानंतर पोलिसांनी घराची झडती घेतली असता संशयित आरोपीच्या कपड्यांवर रक्ताचे डागही आढळले. पोलिसांनी दीप तिवारीची कसून चौकशी केली असता त्याने मुलगा आणि सुनेची हत्या केल्याची कबुली दिली. मुलगा आणि सून दोघांनाही वारंवार विचित्र झटके येत असल्याचं त्यानं पोलिसांना सांगितलं. सूनेलाही तिचा मेलेला भाऊ भेटायला येत असल्याचा भास होत असे. शिवमसुद्धा विचित्र काहीतरी बडबड करत असे. लग्नानंतर दोघेही आपली संपूर्ण कमाई खर्च करायचे. त्यामुळे घरात दररोज वाद होत असत. या सर्व गोष्टींनी त्रस्त होऊन आपण दोघांची हत्या केल्याची कबुली आरोपीनं दिली आहे. आरोपीनं सांगितलं की, याशिवाय कुटुंबात इतरही काही वाद होते. पोलिसांनी चौकशी सुरू केल्यानंतर आरोपी हात जोडून कारण विचारू नका, अशी विनंती करत होता. शिवाय आपण जे कृत्य केलं त्याबद्दल आपल्याला पश्चात्ताप नाही, असंही तो म्हणत होता. रात्री दोघांची हत्या केल्यानंतर आरोपीनं एका भांड्यामध्ये हात धुतले होते आणि नंतर दुसऱ्या खोलीमध्ये जाऊन झोपला होता.
या दुहेरी हत्याकांडाच्या तपासामध्ये बेंझिडीन चाचणी खूप महत्त्वाची ठरली आहे. कोणत्याही प्रकरणाच्या फॉरेन्सिक तपासात (Forensic Investigation) ही चाचणी मोठी भूमिका बजावते. बेंझिडीन किंवा फिनॉल्फथेलिन (Phenolphthalein) चाचणीमध्ये एखाद्या वस्तूवर रक्ताची (Blood Traces) उपस्थिती शोधण्यासाठी तपासणी केली जाते. रक्ताचे डाग मिळाल्यानंतर त्याची डीएनए टेस्ट केली जाते. हे डाग शोधण्यासाठी ल्युमिनॉल नावाचं केमिकल वापरलं जातं.
मुख्याध्यापिकेनं जेवणाच्या डब्यात असं काय आणलं, ज्यामुळे झाली थेट कोठडी
आरोपीनं पोलिसांना सांगितलेलं खूनाचं कारण ऐकून सर्वांना आश्चर्य वाटत आहे. नेमक्या त्याच कारणासाठी खून झाला की, त्यामागे आणखी काही गोष्टी दडलेल्या आहेत, याचा पोलीस शोध घेत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Murder, Uttar pradesh news