Home /News /national /

मुख्याध्यापिकेनं जेवणाच्या डब्यात असं काय आणलं, ज्यामुळे महिलेला झाली न्यायालयीन कोठडी

मुख्याध्यापिकेनं जेवणाच्या डब्यात असं काय आणलं, ज्यामुळे महिलेला झाली न्यायालयीन कोठडी

आसामच्या गुवाहटी (Guwahati) येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका मुख्याध्यापक महिलेने शाळेतच तिच्या जेवणाच्या डब्यात गोमांस (Beef in Lunch Box) आणले होते. याप्रकरणी तिला अटक करण्यात आली.

    गुवाहाटी, 20 मे : आसामच्या गुवाहटी (Guwahati) येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका मुख्याध्यापक महिलेने  शाळेतच तिच्या जेवणाच्या डब्यात गोमांस (Beef in Lunch Box) आणले होते. याप्रकरणी तिला अटक करण्यात आली असून न्यायालयीन कोठडीत (Judicial Custody) पाठविण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिली. काय आहे प्रकरण  दलिमा नेस्सा असे या मुख्याध्यापक महिलेचे नाव आहे. त्या गोलपारा जिल्ह्यातील लखीपूर परिसरातील हरकाचुंगी माध्यमिक इंग्रजी शाळेत मुख्याध्यापिका आहेत. शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांनी तक्रार दिल्यानंतर तिला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. तिला अटक करण्यात आल्यानंतर तिला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिला न्यायालयीन कोठडी सुनावली. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती गोलपारा जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्रिनाल डेका यांनी दिली. नेसावर नेमका काय आरोप  नेसाने शाळेत आपल्या जेवणाच्या डब्यात गोमांस आणले होते. तसेच ते लंच ब्रेकमध्ये काही शिक्षकांना देऊ केले. यापैकी काहींना ते आवडले नाही. राज्य शिक्षण विभाग सरकारी शाळांच्या कामकाजाचा आणि विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधांचा नियमित आढावा घेत होते. यादिवशी म्हणजे 14 मेला ही घटना घडली. जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक मृणाल डेका यांनी सांगितले, लखीपुरच्या हुरकाचुंगी माध्यमिक इंग्रजी शाळेच्या शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांनी मुख्याध्यापिकेविरुद्ध तक्रार दाखल केली होती. यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात आणले गेले. चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली. तर न्यायालयाने दुसऱ्या दिवशी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आसाम राज्यात गोमांसवर बंदी नाही मात्र,... आसाम राज्यात गोमांस खायला बंदी नाही. मात्र, आसाम कॅटल प्रोटेक्शन अॅक्ट, 2021 नुसार ज्या भागात हिंदू, जैन आणि शीख बहुसंख्य राहतात तेथे गुरांची कत्तल आणि गोमांस विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच यासोबत मंदिर किंवा वैष्णव मठाच्या पाच किलोमीटर परिसरातही गोमांस विक्रीवर बंदी आहे. पोलिसांनी सांगितले की, नेसा यांच्यावर, कलम 153 अ आणि 295 अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहितीही डेका यांनी दिली. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Assam, Court, Police, School

    पुढील बातम्या