जाहिरात
मराठी बातम्या / देश / Uttar Pradesh Accident : देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला, 11 मुलांसह 26 भाविकांचा जागीच मृत्यू

Uttar Pradesh Accident : देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला, 11 मुलांसह 26 भाविकांचा जागीच मृत्यू

Uttar Pradesh Accident : देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला, 11 मुलांसह 26 भाविकांचा जागीच मृत्यू

उत्तर प्रदेशातील कानपूरच्या साद पोलीस स्टेशन परिसरात भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉलीचा ताबा सुटल्याने तलावात पडली. यामुळे 26 जणांचा मृत्यू झाला आहे.

  • -MIN READ Kanpur,Kanpur Nagar,Uttar Pradesh
  • Last Updated :

कानपूर, 02 ऑक्टोंबर : उत्तर प्रदेशातील कानपूरच्या साद पोलीस स्टेशन परिसरात भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉलीचा ताबा सुटल्याने तलावात पडली. यामुळे 26 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 30 हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. याबाबतची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. काल (दि.01) रात्री देवदर्शनाला निघालेली ट्रॅक्टर-ट्रॉली रस्त्यावर उलटल्याने 11 मुले आणि 11 महिलांसह 26 जणांचा मृत्यू झाला. तसेच आणखी 30 जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जाहिरात

साध पोलीस स्टेशन हद्दीतील कोरथा गावातील भाविक ट्रॅक्टर-ट्रॉलीने फतेहपूर येथील चंद्रिका देवी मंदिरात गेले होते. ट्रॉलीमध्ये 50 हून अधिक लोक होते. परतत असताना साध ते गंभीरपूर गावादरम्यान रस्त्याच्या कडेला ट्रॅक्टर-ट्रॉली पलटी होऊन तलावात पडली. दरम्यान तलावात पडलेल्या भाविकांना तब्बल एक तास बाहेर येता येत नसल्याने गुदमरून मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. पोलीस आणि बचाव पथकानी घटनास्थळी पोहोचून जखमींना रुग्णालयात दाखल केले.

हे ही वाचा :  वृद्धांना दर्शन घडवण्यासाठी सरसावले दूत, औरंगाबादच्या तरूणाईचा खास उपक्रम Video

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना कानपूर साध परिसरात घडली आहे. अपघातातील जखमी चंद्रिका देवीचे दर्शन घेऊन परतत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचवेळी ट्रॅक्टर-ट्रॉलीचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला पाण्यात पडली. या घटनेत आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाला असून त्यात 11 महिला आणि 11 लहान मुलांचा समावेश आहे. काहींची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना उपचारासाठी कानपूरला पाठवण्यात आले आहे.

जाहिरात

पंतप्रधान मोदींकडून आदरांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून या दुर्घटनेवर दु:ख व्यक्त केले. “कानपूरमधील ट्रॅक्टर-ट्रॉली दुर्घटनेत जीव गमावणाऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी मी शोक व्यक्त करतो. जखमी लवकर बरे होतील अशी अपेक्षा करतो. स्थानिक प्रशासन बाधितांना शक्य ती सर्व मदत करत आहे,” असे पंतप्रधानांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

हे ही वाचा :  पाच हजारांसाठी हत्या, कन्नड घाटात घातपात, अखेर खुन्यांच्या कुकृत्यांचा सर्वनाश

जाहिरात

सीएम योगींचे आवाहन - प्रवासासाठी ट्रॅक्टर-ट्रॉलीचा वापर करू नये

या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी उच्च अधिकार्‍यांकडून फोनवर संपूर्ण माहिती घेतली आहे. त्याचबरोबर जखमींवर उपचार करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. सीएम योगी झालेल्या घटनेबाबत वेळोवेळी माहिती घेत आहेत. या दुर्घटनेनंतर सीएम योगी म्हणाले कि, मालावाहतुकीसाठी ट्रॅक्टर-ट्रॉलीचा वापर करा, ट्रॅक्टर-ट्रॉली प्रवासी आणण्यासाठी व नेण्यासाठी वापरू नये. ही घटना अतीशय दुर्देवी असल्याचे ते म्हणाले.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात