Home /News /national /

कोरोनानं बाप-लेकाला केलं दूर, 7 दिवसाच्या बाळाला पाहण्यासाठी तडफडत होता जीव पण...

कोरोनानं बाप-लेकाला केलं दूर, 7 दिवसाच्या बाळाला पाहण्यासाठी तडफडत होता जीव पण...

देशात सध्या 6,53,717 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

देशात सध्या 6,53,717 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

कोरोनामुळं जीव गमावलेल्या तरूणाला आपल्या नवजात बाळाचा चेहरासुद्धा पाहता आला नाही. हे त्याचं पहिलंच मुलं होतं.

    गाझियाबाद, 04 जून : कोरोनाच्या संकटानं लोकांना आपल्याच प्रियजनांनपासून वेगळं केलं आहे. गाझियाबादमध्येही असाच काहीसा दुर्दैवी प्रकार घडला. कोरोनामुळं जीव गमावलेल्या तरूणाला आपल्या नवजात बाळाचा चेहरासुद्धा पाहता आला नाही. हे त्याचं पहिलंच मुलं होतं. कोरोना पॉझिटिव्ह असलेला हा तरुण मेरठ मेडिकल हॉस्पिटलमध्ये होता. हॉस्पिटलमधून परत आल्यावर आपल्या बाळाला भेटण्याची इच्छा तो सतत बोलून दाखवत होता. मात्र कोरोनानं बाप-लेकाची भेटही घडवून आणली नाही. कोरोनामुळं आपल्या सात दिवसांच्या नवजात मुलाला भेटण्यापूर्वीच तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना संजयनगर सेक्टर 23, गाझियाबाद येथील आहे. आठ दिवसातच येथील एका परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या 32 तरुणाला काही दिवसांपूर्वी ताप आला होता. मेरठ रोड येथील खासगी रुग्णालयात प्रथम डॉक्टरांना दाखवले. कोरोनाच्या संशयावरून त्याची चाचणी करण्यात आली. 25 मे रोजी तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं. उपचार करूनही त्याची प्रकृती दिवसेंदिवस खराब होत गेली. अखेर 1 जून रोजी त्यांचं निधन झालं. त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी घरातील एकही व्यक्ती उपस्थित नव्हती. कारण त्यांच्या कुटुंबातील आणखी तीन सदस्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. वाचा-मुसळधार पावसानंतर रस्त्यावर कोसळली दरड, पाहा LIVE VIDEO रुग्णालयात दाखल केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी झाला बाळाचा जन्म एकीकडे घरात पाळणा हलल्यानंतर घरात आनंदाचे वातावरण होते तर घरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असल्यामुळं चिंताही. 25 मे रोजी तरुणाला मेरठ मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांच्या पत्नीची प्रसुती झाली. मंगळवारी 26 मे रोजी सकाळी सातच्या सुमारास त्याच्या पत्नीने मुलाला जन्म दिला. दोघांचेही रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. फोनवरून तरुणाला ही आनंदाची बातमी सांगितली होती, तेव्हापासून त्याचा जीव लेकाला भेटण्यासाठी तडफडत होता. वाचा-त्याने माझा विश्वासघात केला... LIVE VIDEO शूट करत अभिनेत्रीची आत्महत्या आई आणि दोन्ही भावांना कोरोनाची लागण 1 जून रोजी या तरूणाच्या मृत्यूनंतर कुटुंबालाही कोरोनाचा धोका होता. त्याची आई आणि दोन्ही भाऊ कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. मुलाच्या मृत्यूच्या दुसर्‍याच दिवशी आरोग्य विभागानं त्याच्या आईलाही रुग्णालयात दाखल केले. वाचा-24 तासांत तब्बल 9304 नवीन रुग्णांची नोंद, 'हे' 17 जिल्हे सर्वात धोकादायक
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या