Home /News /viral /

मुसळधार पावसानंतर रस्त्यावर कोसळली दरड, पाहा LIVE VIDEO

मुसळधार पावसानंतर रस्त्यावर कोसळली दरड, पाहा LIVE VIDEO

रस्त्यावर दरड कोसळताना मोठा दगड आल्यानं संपूर्ण रस्ता बंद झाला आहे.

    चंबा, 04 मे : अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीवादळ आणि अम्फाननंतर देशभरात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. याच दरम्यान रस्त्यावर मोठी दरड कोसळून खाली आल्याचा एक VIDEO सोशल मीडियावर तुफान VIRAL होत आहे. मोठ मोठे दगड आणि माती घसरून रस्त्यावर येत असल्याचं या व्हिडीओमधून दिसत आहे. ही दरड कोसळल्यामुळे संपूर्ण रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. हिमाचल प्रदेशातील चंबा (Chamba) उपमंडल भरमौरम इथे हडसर रस्त्यावर बुधवारी दरड कोसळल्याची माहिती मिळाली. सर्वात मोठा दगड कोसळून रस्त्यावर आला. घटनेची माहिती मिळताच अधिकारी आणि ग्रामस्थांनी रस्त्यावरील दगड आणि माती हटवण्याचं काम सुरू केलं. गेल्या काही दिवसांपासून हिमाचल प्रदेशात तुफान पाऊस सुरू होता. बुधवारी पावसानं थोडी उघडीप घेतल्यानंतर ही घटना घडली. सुदैवानं या रस्त्यावरून दरड कोसळताना गाड्या जात नव्हत्या नाहीतर मोठी दुर्घटना घडली असती. रस्त्यावर दरड कोसळताना मोठा दगड आल्यानं संपूर्ण रस्ता बंद झाला आहे. त्यामुळे हा दगड फोडून हटवण्याचं काम करण्यासाठी बराच वेळ लागू शकतो अशी माहिती मिळाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियाव VIRAL झाला आहे. संपादन- क्रांती कानेटकर
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Viral video.

    पुढील बातम्या