मुंबई, 4 जून : मागच्या काही दिवसांपासून सिनेइंडस्ट्रीमधून अनेक निधनवार्ता येतच आहेत. अशात आता एका अभिनेत्रीनं लाइव्ह व्हिडीओ तयार करत आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. कन्नड अभिनेत्री चंदनानं लाइव्ह व्हिडीओ शूट करत विष पिऊन आत्महत्या केली. या व्हिडीओमध्ये ती बराच काळ रडताना दिसत होती. 29 वर्षीय चंदनानं आत्महत्येपूर्वी बॉयफ्रेंडनं तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे.
लाइव्ह व्हिडीओमध्ये चंदनानं सांगितलं की, ती हे टोकाचं पाऊल केवळ तिच्या बॉयफ्रेंडमुळे उचलत आहे. तिनं सांगितलं दिनेश तिचा बॉयफ्रेंड आहे आणि त्यानं तिचा विश्वासघात केला आहे. त्यानं तिचं शारिरीक आणि आर्थिक शोषण सुद्धा केलं आहे. चंदनानं 28 मे ला विष पिऊन आत्महत्या केली मात्र आता हे वृत्त सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आलं आहे.
मीडिया रिपोर्टनुसार चंदनानं विष प्यायल्यानंतर दिनेशनं तिला रुग्णालयात नेलं होतं. मात्र त्याठिकाणी पोहोचेपर्यंत तिचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केल्यानंतर दिनेशनं तिथून पळ काढला. पोलिसांनी दिनेश आणि त्याच्या कुटुंबाच्या विरोधात FIR दाखल केली असून याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिनेश आणि चंदना मागच्या 5 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. चंदनानं या व्हिडीओमध्ये सांगितलं की, या दरम्यान दिनेशनं चंदनाकडून 5 लाख रुपये घेतले होते. त्यानं तिच्याशी लग्न करण्याचं वचन दिलं होतं मात्र पैसे घेतल्यानंतर त्यानं तिच्याकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली. त्याचे इतर मुलींसोबतही प्रेमसंबंध होते. तो तिला सतत धोका देत होता. 5 वर्षांच्या रिलेशनशिपमध्ये दिनेशनं लग्नाचं वचन देतं तिच्यासोबत शारिरीक संबंध ठेवले होते आणि ती गर्भवती राहिली होती.
दिनेश आणि चंदनाच्या नात्याबद्दल तिच्या कुटुंबीयांना माहिती होती. जेव्हा ते लग्नाची बोलणी करण्यासाठी त्याच्या घरी गेले तेव्हा त्याच्या कुटुंबीयांनी चंदनाच्या आई-वडीलांना अपमानास्पद वागणूक दिली आणि दिनेशनं देखील चंदनाशी लग्न करण्यास नकार दिला.
वाचा-फक्त 60 सेकंदांमध्ये 10 घरांवर कोसळलं वडाचं झाड, पाहा थरारक Live Videoवाचा-2 महिन्यांनी पुन्हा उघडणार शॉपिंग मॉल्स; मात्र अनिवार्य असतील हे नियम
Published by:Manoj Khandekar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.