Home /News /national /

24 तासांत तब्बल 9304 नवीन रुग्णांची नोंद, 'हे' 17 जिल्हे सर्वात धोकादायक

24 तासांत तब्बल 9304 नवीन रुग्णांची नोंद, 'हे' 17 जिल्हे सर्वात धोकादायक

भारताचा रिकव्हरी रेट हा 48% आहे. असे असले तरी देशातील 17 जिल्ह्यांमध्ये 20% जास्त पॉझि़टिव्ह रुग्ण आहेत.

    नवी दिल्ली, 04 जून : देशात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे.गेल्या 24 तासांत भारतात तब्बल 9304 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंतचा हा सर्वात जास्त आकडा आहे. याआधी एवढ्या मोठ्या संख्येने नवीन रुग्णांनी नोंद झाली नव्हती. तर, 24 तासांत 260 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, याहस भारतात आता एकूण कोरोनाबाधितांचा आकडा हा 2 लाख 16 हजार 919 झाला आहे. सर्वात जास्त कोरोनाबाधित रुग्ण असलेल्या देशांमध्ये भारता आता सातव्या क्रमांकावर आहे. भारतात सध्या 1 लाख 06 हजार 737 सक्रिय रुग्ण असून 1 लाखांहून अधिक रुग्ण निरोगीही झाले आहे. तर 6075 जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात कोरोनोबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असला तरी एक दिलासादायक बातमी म्हणजे रिकव्हरी रेट. भारतात एक लाखांहून अधिक कोरोना रुग्ण बरे झाले आहेत, याचा अर्थ भारताचा रिकव्हरी रेट हा 48% आहे. असे असले तरी देशातील 17 जिल्ह्यांमध्ये 20% जास्त पॉझि़टिव्ह रुग्ण आहेत. यात दिल्लीतील सर्वात जास्त 9 जिल्हे आहेत. तर महाराष्ट्रातील 5, गुजरात आणि तामिळनाडू येथील प्रत्येकी 1. बिहार आणि उत्तराखंड राज्यांना परराज्यातून मजूरांचा सर्वात जास्त फटका बसला आहे. तर मुंबईमध्ये पॉझिटिव्ह रेट सर्वात जास्त म्हणजे 44 % आहे. राजधानी दिल्लीमध्ये गेल्या 24 तासांत 1513 रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंतची ही सर्वात जास्त संख्या आहे. दरम्यान पावसाळा सुरू झाल्यामुळं येत्या काळात रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात 24 तासांत 122 रुग्णांचा मृत्यू महाराष्ट्रात बुधवारी 122 रुग्णांचा मृत्यू झाला होता. एका दिवसात सर्वात जास्त मृतांची ही नोंद आहे. यासह महाराष्ट्रातील मृतांचा आकडा आता 2587 झाला आहे. तर, गेल्या 24 तासांत 2560 नवीन रुग्णांची नोंद झाली. यासह महाराष्ट्रातील आकडा आता 74 हजार 860 झाला आहे. आतापर्यंत 32 हजार 329 रुग्ण निरोगीही झाले आहेत.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Corona, Corona virus in india

    पुढील बातम्या