Home /News /national /

UP Election Result: उत्तरप्रदेशात बसपाचा दारूण पराभव, मतमोजणी दरम्यान BSP पोलिंग एजंटला Heart Attack

UP Election Result: उत्तरप्रदेशात बसपाचा दारूण पराभव, मतमोजणी दरम्यान BSP पोलिंग एजंटला Heart Attack

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

UP Assembly Election Result live updates: उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना एका पोलिंग एजंटला ह्रदयविकाराचा झटका आला आहे.

    गाझियाबाद, 10 मार्च : उत्तरप्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा, मणिपूर या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठीची मतमोजणी (Assembly Election result) प्रक्रिया सुरू आहे. या निवडणुकांचे निकाल आता हाती येऊ लागले आहेत. त्याच दरम्यान उत्तरप्रदेशातून (Uttar Pradesh) एक मोठी बातमी समोर आली आहे. मतदान प्रक्रिया सुरू असताना एका पोलिंग एजंटला ह्रदयविकाराचा झटका (heart attack) आला आहे. उत्तरप्रदेशातील गाझियाबादमधील मतमोजणी केंद्रावर तैनात असलेल्या बहुजन समाज पार्टी (BSP) पोलिंग एजंट (मतदान केंद्रावरील प्रतिनिधी) याला ह्रदयविकाराचा झटका आला आहे. यानंतर या व्यक्तीला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. गाझियाबाद शहर विधानसभेच्या मतमोजणी केंद्राच्या टेबल क्रमांक 11 वर त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, मतमोजणी प्रक्रिया सुरू असतानाच त्यांना अचानक ह्रदयविकाराचा झटका आला. अचानक घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली. Election Results 2022 Live Updates: कोणाच्या डोक्यावर सजणार विजयाचा मुकूट?, पहा मतमोजणीचे प्रत्येक अपडेट्स गाझियाबाद शहरी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे अतुल गर्ग, काँग्रेसचे सुशांत गोयल, बसपाचे कृष्ण कुमार आणि समाजवादी पक्षाचे विशाल वर्मा हे रिंगणात आहेत. विधानसभा निवडणुकीत गाझियाबाद जिल्ह्यात एकूण 54 टक्के मतदान झाले आहे. या ठिकाणी मोदी नगर येथे सर्वाधिक मतदान झाले तर साहिबाबादमध्ये सर्वात कमी मतदान झाले. उत्तरप्रदेशात भाजपनं मुसंडी मारली आहे. उत्तर प्रदेशाात भाजप 265 जागांनी आघाडीवर आहे. त्यातच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आघाडीवर आहेत. सपा विरुद्ध भाजप मोठ्या संख्येनं आघाडीवर आहे. शेवटच्या तासात हे अंतर थोडं कमी झालं आहे. गोरखपूर सदर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सातत्याने आघाडीवर आहेत. येथे पाचव्या फेरीत योगी 22 हजारांहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत. मुस्लीमबहुल मतदारसंघातही 'योगी'राज उत्तर प्रदेशातलं राजकारणात प्रथमपासूनच जाती-पाती आणि धर्म हे मुद्दे वरचढ ठरले आहेत. अयोध्येचं राम मंदिर हा अनेक वर्षं राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिलं. भाजप, समाजवादी पार्टी, बहुजन समाज पक्ष आणि काँग्रेसनेही या मुद्द्यांना वेळोवेळी महत्त्व दिलं होतं. मोदी लाटेतही उत्तर प्रदेशातील मुस्लीमबहुल मतदारसंघांमध्ये भाजपला फारशी आशा नव्हती. या वेळी मात्र चित्र पालटलं आहे. 73 मुस्लीमबहुल मतदारसंघांपैकी 46 मध्ये भाजप उत्तर प्रदेशातल्या 403 पैकी 73 मतदारसंघांमध्ये मुस्लीम लोकसंख्या अधिक आहे. या भागातून भाजपला यापूर्वी फारशी संधी मिळालेली नव्हती. या वेळी मात्र या 73 पैकी 46 मतदारसंघांमध्येही भाजपच आघाडीवर आहे. वर्षानुवर्षं मुस्लीम मतं गृहित धरणाऱ्या काँग्रेसला या 73 पैकी एखाद्याच मतदारसंघाने हात दिला आहे. समाजवादी पार्टीलाही 73 पैकी फक्त 25 मतदारसंघात आघाडी मिळाली आहे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Assembly Election, UP Election, Uttar pradesh

    पुढील बातम्या